Goa Monsoon: मॉन्सूनच्या पहिल्या 20 दिवसांत गोव्यात 71 टक्के कमी पाऊस

राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास अनुकूल स्थिती
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon: मॉन्सूनच्या हंगामाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या 20 दिवसांतील राज्यातील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार गोव्यात मॉन्सूनच्या पहिल्या 20 दिवसांत 71 टक्के कमी पाऊस झाला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) गोव्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल तयार होत असल्याचे म्हटले आहे.

Goa Monsoon
Goa Petrol-Diesel Price: सलग पाचव्या दिवशी इंधन दर जैसे थे! जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

सुमारे पाच दिवसांच्या विलंबानंतर, नैऋत्य मान्सून 10 जून रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर पोहोचला. तेव्हापासून 22 तारखेपर्यंत राज्यात 174.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. एरवी राज्यातील पावसाची या काळातील सरासरी 607 मिमी इतकी असते.

त्या तुलनेत यंदा पावसाच्या प्रमाणात मोठी घट दिसून येत आहे. जूनच्या पहिल्या नऊ दिवसांत (1 ते 9 जून) राज्यात पाऊस झाला नव्हता. राज्यात 18 जूनला सर्वाधिक म्हणजे सुमारे 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सन 2022 चा विचार करायचा तर तेव्हा जून महिन्यात नऊ टक्के कमी पाऊस झाला होता. त्यानंतर जुलैमध्ये मान्सूनने वेग घेतला होता. त्यापूर्वी 2020 आणि 2021 च्या हंगामात जूनमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली होती.

Goa Monsoon
BJP in Lok Sabha Election 2024: चार राज्यांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत व्यूहरचना; गोव्यातील जागेसाठीही चर्चा

आयएमडीने म्हटले आहे की, राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रदेशात पावसाच्या हालचाली वाढतील. IMD ने 24 आणि 25 जून रोजी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सध्या राज्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. काही धरणे तर पूर्ण आटण्याच्या मार्गावर आहेत. त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारनेही पाण्याचे नियोजन करण्यासाठी पावले उचलली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com