पणजी: प्रक्षोभक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणाऱ्या श्री राम सेनेचे प्रमुख वादग्रस्त प्रमोद मुतालिक यांनी तब्बल १० वर्षानंतर गोव्यात पाऊल ठेवले. २०१४ साली गोव्यात प्रवेशास त्यांच्यावर बंदी घातली होती. भारतमाता की जय संघाचे संस्थापक संघचालक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी शुक्रवारी (२१ मार्च) मुतालिक यांची भेट घेऊन स्वागत केले.
सुभाष वेलिंगकर यांनी तिन्ही संघटनांच्या वतीने शाल व गोव्याची पारंपारिक समई त्यांना भेट म्हणून दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष व हिंदू रक्षा महाआघाडीचे सहाय्यक नितीन फळदेसाई, कार्यकर्ते आनंद गुरव व संजय नाईक उपस्थित होते. श्रीपरशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. मुतालिक यांच्याशी हिंदूजागरण व हिंदूरक्षा तसेच लव्ह जिहाद व हलाल या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती वेलिंगकरांनी दिली आहे.
प्रमोद मुतालिक यांनी २०१४ साली गोव्यात श्रीराम सेनेची शाखा गोव्यात उघडण्याची घोषणा केली होती. यानंतर लगेच गोवा सरकारने त्यांच्यावर प्रवेश बंदी लागू केली होती. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केला होता. प्रमोद मुतालिक हे श्रीराम सेना या कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रक्षोभक वक्तव्यांमुळे मुतालिक नेहमी वादात असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.