Indian Navy: जहाजावर आगीत भाजलेल्या विदेशी नागरिकांच्या मदतीस धावले भारतीय नौदलाचे जवान, चिनी नागरिकाचा मृत्यू

Indian Navy Rescue Operation In Goa Sea: एमव्ही हेलन स्टार या मोठ्या जहाजातून वैद्यकीय रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले.
Indian Navy Rescue Operation
Indian NavyPIB
Published on
Updated on

पणजी: भारतीय नौदलाने शुक्रवारी सकाळी गोव्याच्या किनारपट्टीवर मोठे वैद्यकीय रेस्क्यू ऑपरेशन केले. नौदलाने तीन परदेशी क्रू सदस्यांची जहाजातून सुरक्षितपणे सुटका केली. जहाजावर घडलेल्या दुर्घटनेत क्रू सदस्य भाजल्याने जखमी झाले होते. यापैकी दोन चिनी तर एक इंडोनेशियन नागरिक होता. तर, जखमी चौथ्या चीनी क्रू मेंबरचा मृत्यू झाला.

"रेस्क्यू केलेल्या क्रू सदस्यांना आयएनएस हंसामध्ये गोव्यात आणण्यात आले, तेथून त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले. भारतीय नौदलाने 21 मार्च रोजी सकाळी गोव्याच्या पश्चिमेला सुमारे 230 सागरी मैलांवर पनामा-ध्वज असलेल्या एमव्ही हेलन स्टार या मोठ्या जहाजातून वैद्यकीय रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले", असे नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.

Indian Navy Rescue Operation
Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर फक्त अधिकृत व्यवसायच! दलाल आणि अवैध धंद्यांवर सरकारची करडी नजर

निवेदनात पुढे म्हटले आहे की, MV हेलन स्टारच्या चार क्रू सदस्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यांना तातडीने उच्चस्तरीय वैद्यकीय सेवेची गरज आहे, 20 मार्चच्या रात्री उशिरा भारतीय तटरक्षक दल, मुंबईच्या सागरी बचाव समन्वय केंद्राने (MRCC) नौदलाला कळवले. यानंतर नौदलाने आयएनएस विक्रांत आणि आयएनएस दीपक यांना क्रू सदस्यांना रेस्क्यू करण्यासाठी पाठवले.

Indian Navy Rescue Operation
Goa Shigmotsav 2025: पणजीत शनिवारी शिमगोत्सव मिरवणूक; वाहतूक मार्गात बदल, दुपारनंतर 'हा' मार्ग राहणार बंद

21 मार्च रोजी पहाटे, INS विक्रांतच्या एका सीकिंग हेलिकॉप्टरने एमव्ही हायलन स्टारमधून दोन चिनी आणि एका इंडोनेशियन नागरिकांसह तीन जखमी क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दुर्दैवाने या चौथ्या क्रू मेंबरचा आधीच मृत्यू झाला होता, अशी माहिती नौदलाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com