Complaint to Ponda Police by Hindavi Swarajya Sangathan Dainik Gomantak
गोवा

Ponda: आता श्रीरामावर वादग्रस्‍त पोस्‍ट! हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे फोंडा पोलिसांत तक्रार

धार्मिक तेढ वाढवणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

Controversial Social Media Post On Shree Ram In Ponda: सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्‍त शब्दांचा वापर करून हिंदू लोकांच्या भावना दुखविल्याप्रकरणी हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी वासुदेव नाईक यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तसेच ही पोस्‍ट कणाऱ्या नाझीम अस्लम यांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी नाईक त्यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी राजीव झा, उपनगराध्यक्ष विश्‍‍वनाथ दळवी, माजी नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक शौनक बोरकर, तसेच अन्‍य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वासुदेव नाईक यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी इस्लाम धर्मावर कोणीतरी वादग्रस्‍त विधान केले होते. तेव्हा एका न्यूज चॅनलच्‍या फेसबुक लाईव्ह पोस्टला नाझीम अस्लम यांनी प्रभू श्रीराम यांच्‍यावर वादग्रस्‍त विधान केले आहे.

प्रभू श्रीराम हे समस्‍त हिंदूंचे आराध्‍य दैवत आहे. त्‍यामुळे या पोस्‍टमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांवर आमचा पूर्ण विश्‍‍वास असून निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी आपण यासंदर्भात तपास करून त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्‍यान, या प्रकरणी फोंडा पोलिसांनी १२२/२०२३ अन्वये २९५-अ, ५०५ (२) आयपीसी अंतर्गत तक्रार नोंदवून घेतली आहे.

"या प्रकरणी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो आहे. तसेच आज आम्ही यासंदर्भात हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे तक्रार दाखल केली आहे."

- विश्‍‍वनाथ दळवी, फोंडा उपनगराध्यक्ष

कारवाई करणारच; कोणालाही सोडणार नाही

राज्यात धार्मिक तेढ वाढवणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. कायदा व सुववस्था बिघडविणाऱ्या व अशी कृत्ये करणाऱ्यांविरोधात कठोरातील कठोर कारवाई करा, असा आदेश आपण पोलिसांना दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

फेसबुकवर श्री रामासंदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याचे त्यांच्या निदर्शऩास आणून दिल्यानंतर त्यांनी हे निवेदन केले.

ते म्हणाले, "याधीही असा इशारा दिला होता. तरीसुद्धा काही लोक त्यातून काही शिकलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई झाली आणि होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. कोण कोणत्या धर्माचा वा कोणाच्या जवळचा याचा विचार केला जाणार नाही."

"दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न मुळीच होता कामा नये. धार्मिक सलोखा व शांततेसाठी गोवा ओळखला जातो. ती ओळख पुसण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारवाईपासून कोणीही सुटणार नाही, असा इशाराही त्‍यांनी दिला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT