Burning Car Goa News: पर्वरी, थिवी येथे बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

थिवी येथील घटनेत कारचालक किरकोळ जखमी
Taxi burnt to ashes at Thivim
Taxi burnt to ashes at ThivimDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Burning Car: रविवारी राज्यात दोन ठिकाणी बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. उस्कीवाडे पर्वरी येथे नॅनो कारला आग लागली तर कान्साबोर्ड - थिवी येथे आगीत शेव्हरोलेट कार जळून खाक झाली.

थिवी येथील घटनेत कार चालक किरकोळ जखमी झाला. अग्निशामक दलाच्या मदतीने या बर्निंग कारवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Taxi burnt to ashes at Thivim
Mysterious Deaths In Goa: गोव्यात चाललंय काय? आणखी एक अनोळखी मृतदेह सापडला, दोन दिवसांत तीन घटना

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, करासवाडा येथील भारत जामुनी (38) हे थिवी रेल्वे स्थानकावर टॅक्सीचे भाडे असल्याने जात होते. यावेळी कान्साबोर्ड येथे त्यांची कार आली असता गाडीच्या डॅश बोर्डमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कार थांबवून जामुनी कारबाहेर आले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कार चालक जामुनी यांनी कारमधील अग्नीरोधक काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना अग्नीरोधक काढण्यास जमले नाही. धूर नेमका कुठून येतो हे पाहण्यासाठी त्यांनी कारच्या खाली वाकून पाहिले असता त्यांच्या चेहर्‍यावर अचानक आगीचा भडका उडाला.

या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिस आणि म्हापसा अग्नीशामन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीचा भडका उडाल्याने कारचालकाचा चेहरा, हात तसेच केस काहीप्रमाणात जळाले.

पोलिसांनी तत्काळ कारचालकास आपल्या गाडीतून म्हापशातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अग्नीशामन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली मात्र तोपर्यंत टॅक्सी कार पूर्णतः जळाली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे जवानांनी सांगितले.

दरम्यान उस्कीवाडे पर्वरी येथे नॅनो कारला आग लागून कारचे नुकसान झाले. या आगीत कारच्या मागील भागाचे नुकसान झाले.

Taxi burnt to ashes at Thivim
Goa Mhardol : कशी होणार 'जायांची जत्रा'? उदरनिर्वाह धोक्यात, म्हार्दोळच्या नाईक फुलकार समाजाला का सतावतेय चिंता?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com