Goa CM Pramod Sawant during Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Bhumiputra Bill: जनभावनेपुढे नमले सरकार; भूमिपुत्र विधेयक मागे

सरकारने भूमिपुत्र विधेयकावर नागरिकांकडून goaonline.gov.in या संकेतस्थळावर सूचना मागितल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: अत्यंत वादग्रस्त ठरलेले भूमिपुत्र विधेयक (Bhumiputra Bill) अखेर मागे घेण्याची वेळ सरकारवर (Goa Government) आली. आता हे विधेयक सरकार सुधारित स्वरूपात हिवाळी अधिवेशनात परत आणणार आहे. सरकारने या विधेयकावर नागरिकांकडून goaonline.gov.in या संकेतस्थळावर सूचनाही मागितल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Cm Pramod Sawant) यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता समाज माध्यमावरून ही माहिती दिली. (Controversial Bhumiputra Bill in Goa will be withdrawn)

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला होता. विविध पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे निवेदन देण्याचा धडाका लावला होता. समाज माध्यमातूनही सरकारवर टीकेची झोड उठू लागली होती. लोकक्षोभानंतर अखेर सरकारवर हे विधेयक मागे घेण्याची वेळ आली आहे. या विधेयकातील ‘भूमिपुत्र’ शब्द वगळून त्याऐवजी ‘भू’ हा शब्द समाविष्ट करण्याचे सरकारने सध्या ठरविले असले तरी दोन महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा अधिवेशनातून याबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंडकार कायद्याद्वारे घराखालील जमिनीची मालकी मिळते. तसे तीन हजार खटले प्रलंबित आहेत. घरे नियमित करण्यासाठी २०१६ मध्ये केलेल्या कायद्याखाली ८ हजार अर्ज विचाराधीन आहेत. या दोन्ही कायद्याखाली सरकारी जमीन व कोमुनिदाद जमिनीवर घरे बांधलेले अर्ज करू शकत नव्हते. त्यासाठी हे विधेयक तयार केले आहे. बेकायदा बांधलेली सहा हजार घरे पाडण्याची टांगती तलवार असल्याने हे पाऊल उचलले आहे.

गाभा समितीत चर्चाच नाही; विधेयकावरून वाद सुरू झाल्याची होती कल्पना

घरे व जमिनींची मालकी देणाऱ्या विधेयकात सरकार भूमिपुत्र हा शब्द जोडणार याची कल्पना भाजप पक्ष संघटनेला नव्हती. भाजपच्या पद्धतीनुसार महत्त्वाच्या निर्णयाआधी पक्षाच्या गाभा समितीत चर्चा केली जाते. मुख्यमंत्री त्यावेळी उपस्थित राहून सरकारची भूमिका स्पष्ट करतात. या विधेयकावर गाभा समितीत चर्चाच झाली नाही. विधेयकावरून वाद सुरू झाला आणि याची माहिती गाभा समितीच्या सदस्यांना मिळाली. सरकारविरोधात मत तयार होत असताना अनेकांचा आक्षेप केवळ ‘भूमिपुत्र’ शब्दाला असल्याने तो शब्द गाळण्याविषयी सरकार पक्षात अनुकूल वातावरण तयार झाले. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, महसूल सचिव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा शब्द गाळण्याचा निर्णय घेतला.

विधेयक मागे घेणार

"भूमिपुत्र अधिकारिणी हे वादग्रस्त विधेयक लोकक्षोभानंतर सरकारने मागे घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आता हे विधेयक सरकार सुधारित स्वरूपात हिवाळी अधिवेशनात परत आणणार आहे. त्यापूर्वी त्यावर लोकांच्या सूचनाही ऐकून घेणार आहे."

- क्लिओफात कुतिन्हो, कायदे तज्ज्ञ

खोटारडेपणा उघड

"विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप सरकारने लोकशाहीच्या मंदिरात लोकशाहीचा गळा घोटला असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. सत्य नेहमीच तरते."

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT