Garbage Fire Dainik Gomantak
गोवा

ठेकेदारानेच कचऱ्याला लावली आग

रावणफोंडमधील घटना: संबंधितांना बिले देण्यास शॅडो कौन्सिलचा विरोध

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिका दारोदार तसेच शहराच्या विविध भागांतील ब्लॅक स्पॉटवरील कचरा गोळा करण्यासाठी संबंधित एजन्सींना दरमहा लाखो रु. चुकते करत असते, पण प्रत्यक्षात कचरा वर्गीकरण करून गोळा केला जात तर नाहीच, पण ब्लॅक स्पॉटवरील कचरा तेथेच एकत्रित करून जाळून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. ठेकेदारांकडूनच रावणफोंड येथे त्या कचऱ्याला आग लावली जात आहे. त्यामुळे पालिकेने संबंधित एजन्सींची बीले फेडू नयेत, अशी मागणी शॅडो कौन्सिलने केली आहे.

कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी शनिवारी आके रावणफोंड पुलाजवळील ब्लॅक स्पॉटवरील कचऱ्याला अशा प्रकारे संबंधित एजन्सींच्या कामगारांनीच आग लावल्याचे प्रकरण छायाचित्रासह उघड केले असून पालिकेने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. हे प्रकार न्यायालयाने केलेल्या सूचने विरुध्द असल्याचा दावा करून तेथे दाद मागण्याचा इशाराही दिला आहे.

यापूर्वी अशाच प्रकारे पालिका उद्यानात, आनाफोंत गार्डन व अन्यत्र कचरा गोळा करून आग लावल्याचे उघडकीस आले होते. आग लावण्यासाठीच या एजन्सींना भरमसाट रक्कम चुकती केली जातात का? असा सवाल केला आहे. आज ज्या एजन्सीकडून हे कृत्य घडले आहे, तिला पालिका दरमहा 15 लाख रु. रक्कम चुकती करत आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT