मोपा लिंक रोडमुळे पिडीत शेतकऱ्यांना लढ्यात सामिल होण्याचे आवाहन

आपल्या पदाचा गैरवापर करून जनतेला दडपून टाकणारे, पंचायत आदेश झुगारून स्वत:च्या फायद्यासाठी काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे; पिडीत शेतकऱ्यांची मागणी
Protest Against Mopa Link Road
Protest Against Mopa Link RoadDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा: मोपा विमानतळ लिंक रोडमुळे पिडीत असलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी पुकारण्यात अलेल्या निषेध सभेत सामील होऊन आपली जमीन आणि उदरनिर्वाहाच्या लढ्यात त्यांना साथ देण्याचे आवाहन शनिवारी केले.

Protest Against Mopa Link Road
Banking News: 28 फेब्रुवारीनंतर या बँकेच्या IFSC कोडमध्ये होणार बदल!

मोपा विमानतळ (Mopa Airport) लिंक रोड साइटच्या आजूबाजूच्या गावातील पिडीत शेतकऱ्यांनी, विशेषत: तुळसकरवाडी, शेमेचा अडवण, नागझर यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांची एकजूट दाखवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, स्वयंसेवी संस्थांसह सर्व स्तरातील लोकांना केले. 'चलो नागजार' (चला नागझरला जाऊया) अशा घोषणा देत त्यांनी रविवारी. या निषेध सभेत पिडीत शेतकऱ्यांनी (Goa Farmer) सहभाग दर्शवला तसेच त्यांच्या जमिनी आणि उदरनिर्वाहासाठी सरकारविरोधातील या लढाईत पुढील वाटचालही ते ठरवणार आहेत.

"आम्ही समाजातील सर्व स्तरातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी नागझर येथे रविवारी सकाळी 9.30 वाजता पुकारलेल्या या आंदोलनात आपली उपस्थिती दर्शवून पाठिंबा द्यावा," असे एका पिडीत शेतकऱ्यांनी आवाहन केले.

"आपल्या पदाचा गैरवापर करून जनतेला दडपून टाकणारे, पंचायत आदेश झुगारून स्वत:च्या फायद्यासाठी काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अंदाधुंद ऱ्हास केला जात आहे. तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये जे प्रकल्प येत आहेत, तेही बंद करण्यात आले आहेत. असे मोपा पिडित जनसंघटनाचे सरचिटणीस बाया वरक यांनी मत मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com