Dam gomantak digital team
गोवा

Panaji News : दिलासादायक बातमी! गोवेकरांची पेयजलाची समस्या होणार दूर, धरणसाठ्यात वाढ

पेयजलाची समस्या दूर : अंजुणे, पंचवाडी वगळता इतर जलाशयांत मुबलक पाणी

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : गेल्या 9-10 दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अंजुणे आणि पंचवाडी धरणे वगळता इतर धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे सध्यातरी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.

यंदा मान्सून लांबल्याने राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा कमालीचा कमी झाला होता. पंचवाडी आटले होते, तर अंजुणेने तळ गाठला होता. त्यामुळे या धरणांच्या खालील जलप्रकल्प संकटात आले होते. जलस्रोत खात्याने पिण्याच्या पाण्याकरीता कच्च्या पाण्यासाठी पर्याय व्यवस्थेसाठी अभ्यास सुरू केला होता. अस्नोडा- पडोसे या जुन्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नळ योजनेतून पडोसे प्रकल्पात पाणी आणण्यासाठी चाचणीची तयारी केली होती.

दरम्यान, २३ जून पासून पावसाने जोर धरल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. साळावली धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३,४३६ हेक्टोमीटर इतकी आहे. या धरणात आतापर्यंत ६,०५६ हेक्टोमीटर पाणी साठले आहे. हे धरण २६ टक्के भरलेले आहे. आमठाणेची पाणी साठवण्याची क्षमता ५८५ हेक्टोमीटर आहे.

तेथे सध्या २५२ हेक्टोमीटर पाणी असून, हे धरण ४३ टक्के भरलेले आहे. चापोलीची क्षमता १,१२२ हेक्टोमीटर असून, या धरणात ४६९ हेक्टोमीटर पाण्याचा साठा झालेला आहे. हे धरण ४२ टक्के भरलेले आहे. गावणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १७७ हेक्टोमीटर असून,

या धरणात सध्या ७१.४५ हेक्टोमीटर इतक्या पाण्याचा साठा आहे. हे धरण ४० टक्के भरलेले आहे.सध्या धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे,त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पेरणीच्या कामांनाही सध्या वेग आला आहे.

अंजुणे, पंचवाडीला अजून पावसाची आवश्यकता

धरण क्षमता

‘अंजुणे’ ४,४८३ हेक्टोमीटर

पंचवाडी ४३६ हेक्टोमीटर

शिल्लक पाणीसाठा

२०७ हेक्टोमीटर ४.३१ टक्के

५३ हेक्टोमीटर १२.८ टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT