Container Accident in Porvorim  Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत कंटेनर पलटी झाल्याने अपघात; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे मात्र तीनतेरा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात गुरुवारी रात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातलं. त्यातच भर म्हणजे पर्वरी परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. कंटेनरने आपल्यासह इतर दोन वाहनांचंही मोठं नुकसान केलं आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचे मात्र तीनतेरा वाजले आहेत..

कंटेनरच्या अपघातानंतर अजूनही पर्वरीतील वाहतूक पूर्ववत झाली नसल्याचं चित्र आहे. आधीच पर्वरीत वाहतुकीची कोंडी होत असते, मात्र आता अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने जाहिरातीसाठी लावलेल्या एका गाडीचाही चेंदामेंदा झाला आहे. यामुळे काल गुरुवारी रात्रीपासून सुकूर जंक्शनपासून ते पर्वरीपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या गोवेकरांना मात्र यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

दरम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राज्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला. बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. गिरी येथे अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर भांडारवाडा आमोणा येथे घरावर झाड पडून नुकसान झालं आहे. दुसरीकडे आमोणा येथे रस्त्यावर झाड पडून दोघे जखमी झाले आहेत. तर पर्रा येथे रस्त्यावर वीज वाहिनी पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT