Mopa Kadshi Flood  Dainik Gomantak
गोवा

Mopa News: पाणीपातळी वाढली; कडशीत पंधरा कुटुंबांचा संपर्क तुटला

Goa Rain: पुलाची उंची वाढविल्यास येथील लोकांची गैरसोय दूर होऊ शकते

गोमन्तक डिजिटल टीम

नदी तसेच ओहोळाला आलेल्या पुरामुळे कडशी, मोपा येथील पंधरा कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, अडकून पडलेल्या काही लोकांना पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी पलीकडे पोचविले.

नदी तसेच ओहोळाला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथे राहणाऱ्या पंधरा कुटुंबांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. या कुटुंबांत वृध्द, विद्यार्थी, नोकरी व्यवसाय करणारे असल्याने त्यांची मोठी गैरसोय होते.

काही वर्षांपूर्वी सरकारने या नदीवर दोन पाइप घालून साकव उभारला होता. परंतु हा साकव उभारला तेव्हा तिराळी धरण प्रकल्प व मोपा विमानतळ पूर्ण झाले नव्हते.

मोपा पठारावरील पाणी नदीला मिळते तसेच तिराळीचेही पाणी येते त्यामुळे नदी व ओहोळाची पातळी वाढते व पूर येतो. त्यामुळे मध्ये वसलेल्या कडशी गावाचा संपर्क तुटतो.

या भागातून मोपा गावात जाण्यासाठी एक ते दीड किलो मीटरची वाट आहे, परंतु तीही पावसाळ्यात बंद होते. येथील पुलाची उंची वाढविल्यास येथील लोकांची गैरसोय दूर होऊ शकते. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अनेकदा याबाबत आश्‍वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT