Chimbal Flyover Dainik Gomantak
गोवा

Chimbel Flyover : Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Chimbel Junction Flyover: पणजी-बंगळुरू महामार्गावर चिंबल जंक्शनवर आवश्यक बनलेल्या उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्णत्वाकडे येत आहे. सांताक्रूझचे आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस यांनी पुढाकार घेत या पुलाच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Chimbel Junction Flyover News

पणजी: पणजी-बंगळुरू महामार्गावर चिंबल जंक्शनवर आवश्यक बनलेल्या उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्णत्वाकडे येत आहे. त्यामुळे जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेव्हीयर यांच्या अवशेषांचे प्रदर्शनापूर्वी एक मार्ग खुला होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. एक मार्ग खुला झाल्यानंतर चौकातून चिंबल-रायबंदर याठिकाणी वाहने वळविणे किंवा नेणे अधिक सोपे होणार आहे.

सांताक्रूझचे आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस यांनी पुढाकार घेत या पुलाच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला. शिवाय येथील लोकांनी अपघात घडल्यानंतर वारंवार आंदोलने केली होती, त्या-त्यावेळी या उड्डाणपुलाची मागणी पुढे रेटली जात होती.

अखेर सरकारने या पुलाच्या कामाला गतवर्षी सुरुवात केल्याने आता या पुलाचा एक मार्ग पूर्णत्वाकडे आला आहे. या मार्गावरून वाहनांची ये-जा सुरू झाल्यास जंक्शनवर वाहनांची दिसणारी वाहतूक कोंडी नजरेस पडणार नाही.

चिंबल जंक्शनवर चिंबल, रायबंदर येथील रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाती जीवितहानी झाल्यानंतर येथील जनतेने तीव्र आंदोलन करीत रास्ता रोकोसुद्धा केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT