Mapusa Footpath Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: हुश्श! अखेर पादचाऱ्यांना दिलासा; म्हापसा शहरात तीन पदपथांची पायाभरणी

Mapusa Footpath News: म्हापशात पादचाऱ्यांना कोर्ट जंक्शनापासून धुळेर बाजूने, जिल्हा रुग्णालय रस्ता आणि म्हापसा टॅक्सी स्टँडच्या दिशेने चालण्यासाठी एक समर्पित पदपथ मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, म्हापसा नगरपालिका व सार्वजनिक कार्य विभागाने पायाभरणी करून पुढील काम हाती घेतले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa City Footpath Work

म्हापसा: अखेर म्हापशात पादचाऱ्यांना कोर्ट जंक्शनापासून धुळेर बाजूने, जिल्हा रुग्णालय रस्ता आणि म्हापसा टॅक्सी स्टँडच्या दिशेने चालण्यासाठी एक समर्पित पदपथ मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, म्हापसा नगरपालिका व सार्वजनिक कार्य विभागाने मंगळवारी पायाभरणी करून पुढील काम हाती घेतले.

कोर्ट जंक्शनपासून तिन्‍ही रस्त्यांवर पदपथ बांधकामाची पायाभरणी आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या हस्ते म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालिका अभियंते प्रशांत नार्वेकर, साबांखा अभियंता महेश शेट्टी व पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्‍वारीस यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

या तीन पदपथांचे काम

या कामांमध्‍ये म्हापशातील तीन व्यस्त रस्त्यांवर फूटपाथ बांधणे समाविष्ट आहे. ते म्हणजे कोर्ट जंक्शन ते जिल्हा रुग्णालय, जेथे सुमारे दीड किलोमीटर पट्ट्यात साईड ड्रेनसह फूटपाथ बांधला जाईल. या कामावर सुमारे २.५३ कोटी खर्च येणार आहे. दुसऱ्या कामात कोर्ट जंक्शन ते म्हापसा टॅक्सी स्टँडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथ आणि साईड ड्रेन बांधणे समाविष्ट आहे, ज्याची किंमत सुमारे १.१४ कोटी रुपये असेल. तिसऱ्या कामामध्ये कोर्ट जंक्शन ते धुळेर फुटबॉल मैदानापर्यंत फूटपाथ व साईड ड्रेनचे बांधकाम समाविष्ट आहे. या कामावर १.१५ कोटी रुपये खर्च आला आहे.

म्‍हापशात महत्त्‍वाच्‍या ठिकाणी तीन पदपथांचे काम सुरू करण्‍यात आले आहे. येत्या तीन-चार महिन्यांत ते पूर्ण होईल. या कामांमुळे विद्यार्थ्यांना, कोर्ट जंक्शनकडे चालत जाणाऱ्या लोकांची चांगली सोय होईल.
जोशुआ डिसोझा, उपसभापती तथा म्हापशाचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT