Vijay Sardesai on Western Bypass Dainik Gomantak
गोवा

Western Bypass: बाणावलीचा भाग स्‍टील्‍टवर न बांधण्‍यासाठी गोव्‍यातूनच कारस्‍थान; विजय सरदेसाईंचा आरोप

हा भाग बुडणार हे केंद्रीय निरीक्षकांनीही केले होते मान्‍य

Kavya Powar

Vijay Sardesai on Western Bypass : वेस्‍टर्न बायपासचा बाणावली दरम्‍यानचा काही रस्‍ता मातीचा भराव टाकून न बांधता तो स्‍टील्‍टवर बांधावा यासाठी आपण केलेली मागणी केंद्रीय राष्‍ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मान्‍य केली होती. मात्र आता हा प्रस्‍ताव फेटाळून लावला आहे.

यामागे गोवा सरकारमध्‍ये असलेल्‍यांचेच कारस्‍थान असावे, अशी शंका आपल्‍याला येते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

सरदेसाई यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री गडकरी यांची दिल्‍लीत भेट घेतली होती. बाणावली भागातील रस्‍ता मातीचा भराव टाकून तयार केल्‍यास पावसात या भागात पूर येईल असे सांगून या भागातील रस्‍ता स्‍टील्‍टवर बनवावा अशी मागणी केली होती.

त्‍यानंतर गडकरी यांनी केंद्रातून एका तज्‍ज्ञाला गोव्‍यात पाहणी करण्‍यासाठी पाठविले होते. ही पाहणी करुन तज्‍ज्ञ दिल्‍लीला गेल्‍यानंतर आता हा प्रस्‍ताव फेटाळून लावल्‍याचे सांगितले जाते.

पावसात या भागात पाणी अडून पूर येऊ शकतो ही शक्‍यता केंद्रीय तज्‍ज्ञानी मान्‍य केली आहे. याचाच अर्थ मी जी पूर्वी भीती व्‍यक्‍त केली होती ती योग्‍य होती यावर शिक्‍कामोर्तब होत आहे.

त्‍यावेळी गडकरी यांनी अशी अडचण येत असल्‍यास हा रस्‍ता स्‍टील्‍टवर बांधू असे आपल्‍याला आश्वासन दिले होते.

मात्र त्‍यानंतर गोवा विधानसभेत या प्रस्‍तावावर चर्चा झाली. हा रस्‍ता स्‍टील्‍टवर उभारल्‍यास त्‍याचे श्रेय मला मिळणार या एकमेव कारणावरुन गोवा सरकारातील काही महाभागानी केंद्राची दिशाभूल करून हा प्रस्‍ताव नाकारण्‍यास भाग पाडले असावे, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

हा रस्‍ता स्‍टील्‍टवर बांधण्‍यासाठी सरकारकडे पैसे नसल्‍याचे कारण पुढे केले जाते. मात्र सरकारकडे नको असलेल्‍या इव्‍हेंटवर खर्च करण्‍यासाठी मुबलक पैसे आहेत.

पण सासष्‍टीच्‍या लोकांसाठी जी कायमस्‍वरुपी समस्‍या भेडसावू शकते त्‍यावर खर्च करण्‍यास पैसा नाही ही बाब अत्‍यंत दुर्दैवी असल्‍याचे मत सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT