चतुर्थीपूर्वी ज्‍येष्‍ठ नागरिकांना मासिक पेन्‍शन न दिल्‍यास समाजकल्‍याण अधिकार्‍यांना घेराव; गोवा फॉरवर्डचा इशारा

सरकारला दोन दिवसांची मुदत
Durgadas Kamat
Durgadas KamatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्‍यातील सर्वांत मोठा हिंदूचा सण असलेली चतुर्थी अवघ्‍या सात दिवसांवर पोचली आहे आणि तरीही दयानंद सामाजिक सुरक्षा या योजनेतून ज्‍येष्‍ठ नागरिकांना मिळणारे मासिक पेन्‍शन अजून त्‍यांन मिळालेली नाही ही गोष्‍ट अत्‍यंद दुर्दैवी असून चतुर्थीपूर्वी सरकारने हे पेन्‍शन दिले नाही तर समाजकल्‍याण खात्‍याच्‍या अधिकार्‍यांना आम्‍ही घेराव घालू असा इशारा गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी दिला आहे.

Durgadas Kamat
Goa University: गोवा विद्यापीठ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात! प्राध्यापकाला गुंडाकडून धमकी...

कामत यांनी या संदर्भात जे ट्‍वीट केले आहे त्‍यात या वृद्धांना मिळणार्‍या पेन्‍शनची रक्‍कम येत्‍या दोन दिवसांत त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करावी अन्‍यथा आमचा घेराव हा ठरलेला आहे. गोवा सरकारचे वृद्धांकडेही लक्ष नाही हे यातून सिद्ध होते असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Panel Damodar College Election
Goa Forward Congress Merger Proposal
Goa First Secular Alliance
Goa First Alliance Formation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com