Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘तिसरा जिल्हा’ ही काँग्रेसची दूरदृष्टी: युरी आलेमाव

Goa Politics: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती हा काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा भाग आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यासाठी कॉंग्रेसचे एक दूरदृष्टीचे धोरण लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत, याचा मला आनंद आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती हा काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा भाग आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यासाठी कॉंग्रेसचे एक दूरदृष्टीचे धोरण लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत, याचा मला आनंद आहे.

तिसरा जिल्हा फोंडा, धारबांदोडा, सत्तरी आणि सांगे तालुक्यातील नागरिकांना मदतगार ठरेल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. तिसरा जिल्हा निर्मितीच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या शासनाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी भाजपला अखेर काँग्रेस पक्षाच्या धोरणांचे महत्त्व कळायला लागले आहे, असा टोला लगावला.

प्रभावी प्रशासन आणि नागरिकांना सुलभता देण्यासाठी गोव्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याच्या आमच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी टीका करून सदर आश्वासनाची खिल्ली उडवली होती. अखेर गोवा आणि गोमंतकीयांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षाचे धोरणच योग्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

शासनाकडून नवीन जिल्हा प्रशासनाला पायाभूत सुविधांची योग्य संसाधने तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. यामुळे नागरिकांना विविध सेवा प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल. फोंडा, धारबांदोडा, सत्तरी आणि सांगे तालुक्यांतील लोकांना तिसऱ्या जिल्ह्याचा लाभ मिळेल, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT