Karnataka Election Result
Karnataka Election Result  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकातील काँग्रेसच्या बहुमतामुळे राज्यातील समीकरणं बदलणार- कार्लुस आल्मेदा

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Election Result कर्नाटकातील विधानसभेत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने विजय संपादन करून भाजप सरकारला दणका देण्यास सुरुवात केली आहे.

तसेच कर्नाटकातील जनतेने काँग्रेस पक्षाला प्रामाणिकपणे साथ देऊन, भारतीय जनता पक्षाला त्याची योग्य जागा दाखविली असल्याची माहिती वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली आहे.

यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशाची जनता काँग्रेस पक्षा बरोबर राहून हुकूमशाही पद्धतीने सत्ता करणाऱ्या भ्रष्ट्राचारी भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करणार आहे. गोव्यातील भाजप सरकारने जनतेची दिशाभूल करून गैर मार्गाने सत्ता स्थापन केली होती.

लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षाचा उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे. तसेच वास्को मतदार संघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पडलेल्या मतदाना पेक्षा, जास्त मते दक्षिण गोव्यातील काँग्रेस लोकसभा उमेदवाराला मिळवून देणार.

वास्कोतील भाजप आमदाराने त्यांना पडलेल्या मता एवढीच मते घेऊन दाखवावे, असे आव्हान वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केले आहे.

गोव्यातील भाजप आमदार,मंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन भाजप उमेदवाराना प्रचार केलेल्याना फक्त दोन टक्के यश मिळाले.

यावरून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे चित्र लवकरच येथील जनतेला पाहायला मिळणार असल्याची माहिती माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली.

दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवाराला वास्को मतदार संघातून आघाडी मिळवून देण्यासाठी येथील काँग्रेस कार्यकर्ते एकनिष्ठेने कार्य करणार आहे.

गोवा प्रदेश कॉग्रेस समिती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून देणार्‍या उमेदवाराला वास्को काँग्रेस मंडळ इमानदारीने कार्य करणार आहे.

दक्षिणेतून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला वास्को मतदार संघातून 2022 विधानसभा निवडणुकीत, मला पडलेल्या मताधिक्या पेक्षा जास्त मते मिळवून देणार अशी माहिती माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली आहे.

मी खुले आव्हान वास्कोच्या लोकप्रतिनीधीला करतो, त्यांने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पडलेली मते मिळवून दाखवावी. कर्नाटक राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन, गोव्यातील राजकारणातील समिकरण बदलून टाकले आहे.

यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात अखिल भारतीय काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचे माजी आमदार आल्मेदा यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT