Congress Candidates meeting Dainik Gomantak
गोवा

Goa Vote Counting Day: 'काँग्रेस उमेदवारांना मतमोजणीलाही सोडणार नाही'

निवडणूक एजंट्सना अधिकार: गोवा फॉरवर्डचे उमेदवारही आतच

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसचे आमदार फुटून भाजपला मिळू नयेत, यासाठी सर्व उमेदवारांना हॉटेलमधून बाहेर न पडू देण्याचा निर्णय काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या आज मडगावात झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून त्यांना मतमोजणीसाठीही बाहेर सोडले जाणार नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

आज मडगाव येथील मॅजेस्टिक हॉटेलमध्ये काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीत उमेदवारांना मतमोजणीस न पाठविता त्यांच्या निवडणूक एजंटांना मतमोजणीस उपस्थित राहण्याचे अधिकार दिले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनाही हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर जिंकण्याएवढे आमदार जिंकून आले तर त्यांना राज्यपालांकडे नेऊन परस्पर सत्तास्थापनेचा दावा करण्याचे ठरविले आहे.

सरकार आमचेच: गिरीश चोडणकर

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस पक्षच उद्या सरकार स्थापन करणार, असा दावा केला. मुख्यमंत्री कोण होणार असे विचारले असता तो निर्णय निवडून येणारे आमदार घेतील, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जंगली जीवनाचा थरार! अजगराने दोन बेडूक गिळले, पण लोभ नडला; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Vidya Balan: 'तुझं नाक खूप मोठं आहे, सर्जरी कर...'; बॉलिवूड दिग्दर्शकाने विद्या बालनला का दिला होता सल्ला? स्वत:च केला मोठा खुलासा

Senior Citizens: देशातील 70 टक्के ज्येष्ठांचा खिसा रिकामा, उदरनिर्वाहासाठी अनेकजण निवृत्तीनंतरही कामावर

IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

Goa News Live Update: 'बीएल‍ओ'च्या मानधनात दुपटीने वाढ!

SCROLL FOR NEXT