Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: कुडतरीत रंगणार ‘काँग्रेस विरुध्द काँग्रेस’ चुरस

मतदारसंघाच्या समीकरणात बदल

दैनिक गोमन्तक

Goa Congress: कुडतरीतून तीन वेळा निवडून आलेले आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे सध्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे या मतदारसंघाच्या समीकरणात बदल झाल्याचे दिसते आहे.

वास्तविक जि.पं.सदस्य रिबेलो मोरेन (Moreno Rebello) पण कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. पण रेजिनाल्ड तृणमूलमध्ये (TMC) गेल्यावर ते परत कॉंग्रेसमध्ये आले. यामुळे रेजिनाल्डनी तृणमूल सोडल्यानंतर उमेदवारी रिबेलोंना मिळणार का, रेजिनाल्ड यांना मिळणार याकडे लोकांचे लक्ष होते. पण शेवटी उमेदवारी रिबेलो यांच्याच गळ्यात पडली. आणि त्यामुळे रेजिनाल्डना अपक्ष म्हणून रिंगणात उतरणे भाग पडले. हे पाहता कुडतरीत कॉंग्रेस (Congress) विरूध्द कॉंग्रेस अशी लढत होणार आहे. (Congress vs Congress war in curtorim)

वास्तविक रेजिनाल्ड (Aleixo Reginaldo) हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यांचे नाव कॉंग्रेसच्या पहिल्याच यादीत जाहीर झाले होते. असे असूनही रेजिनाल्ड यांनी आमदारकीचा तसेच कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये उडी घेतली होती. पण केवळ सत्तावीस दिवसातच त्यांनी त़ृणमूलला बाय बाय करून कॉंग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिले होते. कॉंग्रसने मात्र, परत त्यांना उमेदवारी न देता ती उमेदवारी माजी जि. पं. सदस्य मोरेन रिबेलो यांना दिली.

रेजिनाल्ड हे तीन वेळा निवडून आल्यामुळे त्यांचा या मतदारसंघाशी चांगलाच संपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. ते 2012 व 2017 साली कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्यामुळे काही कॉंग्रेसची मते त्यांच्या बाजूला वळू शकतात. पण त्याचबरोबर कॉंग्रेसची जी पारंपरिक मते आहेत ती मात्र रिबेलोंच्या पदरात पडू शकतात.

भाजपने ॲंथनी बार्बोझा यांना उमेदवारी दिली असली ते दोन नावांवर पाय ठेवून असल्यासारखे वाटताहेत. भाजप आलेक्स रेजिनाल्डना बाहेरून पाठिंबा देणार, अशी सुध्‍दा चर्चा सुरु होती. पण त्यांनी बार्बोझा यांना उमेदवारी देऊन एका दगडात दोन तीर मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. रेजिनाल्ड हे तीनदा निवडून येऊनही मंत्री झालेले नाही. पुन्हा निवडून आल्यास ते भाजपला पाठिंबा देऊन मंत्रिपद पटकावू शकतात. आपतर्फे डॉमनिक गांवकर यांना उमेदवारी दिली असून कुडतरीत त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तरीही रेजिनाल्ड विरूध्द रिबेलो असेच या लढतीचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT