Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील अल्पसंख्यांकासाठी कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका निभावणार'

भारत (India) देश लोकशाही प्रधान असल्याने येथे सर्व धर्मीय एकत्रितपणे आपली संस्कृती जतन करीत आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) देश लोकशाही प्रधान असल्याने येथे सर्व धर्मीय एकत्रितपणे आपली संस्कृती जतन करीत आहे. गोवा प्रदेश काँग्रेस पक्ष येतील अल्पसंख्यांकांचे कार्य करण्यास महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी दिली.

वास्को येथील झुआरी कॉम्प्लेक्समध्ये गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांच्या गोवा अल्पसंख्यांक काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी वरील माहिती माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत गोवा प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, गोवा काँग्रेस मुख्य प्रभारी दिनेश गुंडू राव, वास्को काँग्रेस गट अध्यक्ष ऊलारीको रॉड्रिगीस, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, शरद चोपडेकर, रूडाल्फ फर्नांडिस, मुनीर खान, माजी नगरसेवक सैफुल्ला खान व इतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना कामत म्हणाले की नजीर खान यांनी आपली सेवा अल्पसंख्यांका बरोबर सर्वसामान्य जनतेला सुद्धा द्यावी. यामुळे काँग्रेसचे कार्य सर्वापर्यंत पोहोचणार अशी माहिती कामत यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की संपूर्ण मुरगाव तालुक्यात काँग्रेस यशस्वी होऊन येथे काँग्रेसची सत्ता आणणार आहे. राज्यातील अल्पसंख्यांकांची समस्या नजीर खान यांने जाणून घेण्यासाठी सर्व तालूक्यात समित्या स्थापन करावे.

गोवा कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी गोव्यात अल्पसंख्यांकांची समस्या नजीर खान यांचे नेतृत्व योग्य रित्या पार पाडील. यात खान यांचे इतर अल्पसंख्यांकांना सुद्धा सामावून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. गोवा अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष नजीर खान यांनी सांगितले की गोवा प्रदेश काँग्रेसने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी पूर्णपणे पार पडणार आहे. काँग्रेस पक्षासाठी मी निस्वार्थीपणे सेवा बजावणार असून यात मला जेष्ठ कार्यकर्त्यांचा पाठिंबा लावणार असल्याची माहिती नजीर खान यांनी शेवटी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT