गुजराती बांधवांचा गोव्‍यात सन्‍मान : मुख्यमंत्री सावंत

गुजराती बांधवांना राज्यात सन्मानाने वागविण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.
Welcome
WelcomeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दीव-दमणमधील गोव्याच्या प्रभावापासून गुजरातशी राज्याचे चांगले संबंध राहिले आहेत. गुजराती बांधवांना राज्यात सन्मानाने (Welcome) वागविण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी व्यक्त केले.

गुजरात सरकारच्या वतीने आयोजित ‘सदाकाल गुजरात’ या समारंभात मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी (Gujarat Home Minister Harsh Sanghvi) उपस्‍थित होते. गुजरात सरकारने पणजी गुजराती युवक मंडळाच्‍या सहकार्याने ‘सदाकाळ गुजरात’ या अनिवासी गुजरातींसाठींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी गुजरातींची भलावण केली. गुजराती लोकांनी राज्याच्या विकासात बहुमोल योगदान दिले आहे. हे लोक आता गोवेकर झाले आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असेही ते म्‍हणाले.

Welcome
रानडुकरांप्रमाणेच खेती आणि माकडांनाही मारण्‍याची परवानगी द्या ; शेतकऱ्यांची मागणी

संघवी म्हणाले, गुजराती समाजाने देशभरात आपल्या समाजसेवेतून गुजरातची सेवाभावी प्रतिमा जपली आहे. ती पुढे घेऊन जाताना गोव्यातही या समाजाने सेवाभाव जपत येथील संस्कृती जपतानाच गुजराती सांस्कृतीही जतन केली आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, गुजराती लोकांनी राज्यातील भाषा-संस्कृती आत्मसात केली आहे. त्यामुळे हे लोक आम्हाला आमचेच वाटतात. दरम्‍यान, गुजराती मंडळाच्या वतीने अनेकांचा सेवाभावी कार्याबद्दल सन्‍मान करण्यात आला. व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा काजल शाह, भाजप नेते नरेंद्र सावईकर यांचीही उपस्थिती होती.

प्रचाराची रंगीत तालीम?

या कार्यक्रमात बोलताना गुजरातचे गृहमंत्री संघवी यांनी गुजरातींना त्यांच्या मातृभूमीशी जोडण्यासाठी हा उपक्रम असल्याचे म्हटले. प्रत्यक्षात मात्र भाजपचीच भलावण चालली होती. गुजराती समाजाने भाजपची पाठ सोडू नये, असे थेट आवाहनच त्यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही वारंवार भाजपचा उल्लेख करीत हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केला गेलाय, याची प्रचितीच दिली. प्रत्यक्षात ही प्रचाराची रंगीत तालीमच होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com