Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Viriato Fernandes: काँग्रेस पक्षाची नवी रणनीती; विरियातो फर्नांडिस ‘कॅप्‍टन’? दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा

Goa Congress: गोव्‍यातील विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे बाकी असले तरी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी नवीन रणनीती आखली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: गोव्‍यातील विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे बाकी असले तरी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी नवीन रणनीती आखली आहे. या रणनीतीचे कॅप्‍टन म्‍हणून दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना नेमले आहे. काँग्रेसच्‍या या नवीन रणनीतीला दिल्‍लीतील पक्षश्रेष्‍ठींचा पूर्ण पाठिंबा असून दिल्‍ली नेतृत्‍वाने कॅ. फर्नांडिस यांना यासाठी पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोन्‍ही केंद्रीय काँग्रेस नेत्‍यांचा कॅ. फर्नांडिस यांना पूर्ण पाठिंबा असल्‍याचे सांगितले जाते.

गोव्‍यातील अन्‍य काँग्रेस नेते सध्‍या फारशी हालचाल करताना दिसत नसतानाही कॅ. फर्नांडिस मात्र अगदी सक्रिय झाले आहेत. दक्षिण गोव्‍याबरोबरच त्‍यांनी उत्तर गोव्‍यात आपले दौरे सुरू केले आहेत. एवढेच नव्‍हे, तर अन्‍य पक्षातील नेत्‍यांनाही काँग्रेसकडे वळविण्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न चालू केले आहेत.

ताळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्‍या पदाधिकारी सिसील रॉड्रीगीस आणि कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्‍वेरा या दोघांनाही कॅ. फर्नांडिस यांनी काँग्रेस पक्षात येण्‍याचे आमंत्रण दिले आहे अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

आम आदमी पक्षाच्‍या अन्‍य काही सदस्‍यांकडेही कॅ. फर्नांडिस यांनी संपर्क साधण्‍यास सुरवात केली असल्‍याचे सांगितले जाते. अर्थातच कॅ. फर्नांडिस यांना याबाबतीत विचारले असता, मी या दोघांना भेटलो ही जरी गोष्‍ट खरी असली तरी मी कुणालाही काँग्रेस पक्षात येण्‍याचे आमंत्रण दिलेले नाही, असे त्‍यांनी सांगितले.

MP Viriato Fernandes

कॅ. फर्नांडिस हे काल कळंगुट येथे गेले असता त्‍यांचे स्‍वागत करण्‍यासाठी स्‍वत: जोजफ सिक्‍वेरा उपस्‍थित होते. यावेळी सिक्‍वेरा आणि कॅ. फर्नांडिस यांच्‍यात बातचीतही झाली. सध्‍या काँग्रेस वर्तुळात यासंबंधी वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या चर्चा चालू आहेत. यासंदर्भात कॅ. फर्नांडिस यांना विचारले असता, मी कळंगुटला लोकांच्‍या समस्‍या ऐकून घेण्‍यासाठी गेलो होतो. त्‍यावेळी स्‍थानिक सरपंच म्‍हणून सिक्‍वेरा यांनी आपले स्‍वागत केले.

त्‍यामागे कुठलेही राजकारण नव्‍हते असे ते म्‍हणाले. यापूर्वी मी काणकोण दौरा केला त्‍यावेळी पैंगीण पंचायतीला भेट दिली असता, माझे स्‍वागत करण्‍यासाठी स्‍थानिक सरपंच असलेल्‍या सभापती रमेश तवडकर यांच्‍या पत्‍नी सविता तवडकर या उपस्‍थित होत्‍या. हे दोन्‍ही सरपंच केवळ सरपंच या नात्‍याने आणि शिष्‍टाचाराचा भाग म्‍हणून तेथे आले होते. अन्‍य दुसरे काही नाही, असे त्‍यांनी सांगितले.

काणकोणकरांकडून मिळाले प्रेम

लोकांच्‍या समस्‍या ऐकून घेण्‍यासाठी मी ज्‍या ज्‍या ठिकाणी जातो, त्‍या त्‍या ठिकाणी लोकांकडून मला उत्‍स्‍फूर्त पाठिंबा मिळतो. मागच्‍या आठवड्यात मी काणकोणचा दौरा केला होता. त्‍यावेळी खोतीगाव, गावडोंगरी यासारख्‍या भागातून मला जो प्रतिसाद मिळाला तो अपेक्षेबाहेरचा होता. खोतीगाव येथील एसटी बांधवांनी तर माझ्‍यासाठी रात्रीच्‍या जेवणाचीही व्‍यवस्‍था केली होती. त्‍यांची गाऱ्हाणी कोण तरी ऐकायला येतो हीच त्‍यांच्‍यासाठी फार मोठी गोष्‍ट होती, असे कॅ. फर्नांडिस यांनी सांगितले.

‘काँग्रेसची फळी उभारण्यासाठी माझे प्रयत्न’

गोव्‍यात काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी उभारण्‍यासाठी आपले प्रयत्‍न चालू आहेत, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मान्‍य केले. ज्‍या ठिकाणी काँग्रेसकडे मतदार आहेत, त्‍या मतदारसंघावर आम्‍ही लक्ष केंद्रित केले आहे. काणकोण, कळंगुट, मांद्रे, मडकई, शिवोली, थिवी, सांताक्रूझ, सांगे, वेळ्‍ळी, बाणावली या मतदारसंघाकडे आम्‍ही विशेष लक्ष देण्‍याचे ठरविले आहे. या मतदारसंघात यापुढेही आपण भेट देऊन लोकांच्‍या गाठीभेटी घेणे सुरूच ठेवणार आहे. सध्‍या गोव्‍यात कित्‍येक मतदारसंघ असे आहेत, जेथे काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. मात्र, मागच्‍या काही वर्षात काँग्रेस पक्षाने आमच्‍याकडे दुर्लक्ष केले अशातर्हेची भावना या मतदारांमध्‍ये निर्माण झाली आहे. या मतदारांमध्‍ये विश्वास निर्माण करण्‍यासाठीच मी उत्तर गोव्‍यातही दौरे करत आहे. या दौऱ्यात लोकांकडून मिळणारा प्रतिसाद अपेक्षेबाहेरचा असल्‍याचेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT