Yuri Alemao Congress revival Dainik Gomatnak
गोवा

Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

Yuri Alemao: मडगावात जिल्हा पंचायत तसेच विद्यापीठ निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा कॉंग्रेसतर्फे गौरव करण्यात आला. यावेळी युरी आलेमाव बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: जिल्हा पंचायत आणि गोवा विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे, गोव्यातील कॉंग्रेस पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.

मडगावात जिल्हा पंचायत तसेच विद्यापीठ निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा कॉंग्रेसतर्फे गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आलेमाव म्हणाले, की आमच्या पक्षाची विद्यार्थी परिषद आता गोवा विद्यापीठातील कुलगुरू व उपकुलगुरू यांच्या हुकुमशाहीला लगाम घालणार आहे. त्याचप्रमाणे अफरातफर, बेकायदेशीरपणा, भ्रष्टाचार यांचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

खासगी विद्यापीठांना मान्यता, हा एक घोटाळा आहे. आम्ही विधानसभेत खासगी विद्यापीठाच्या मान्यतेला विरोध केला होता. ही खासगी विद्यापीठे गोमंतकीय विद्यार्थी आणि गोव्याच्या हिताची मुळीच नाहीत, असेही आलेमाव यांनी सांगितले.

‘एनएसयुआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी म्हणाले, की गोवा विद्यापीठ निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

दडपशाहीसमोर विद्यार्थी नमले नाहीत

कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर म्हणाले, की ‘अभाविप’ने नेहमीच लबाडी, हातचलाखी करून विद्यापीठातील निवडणुका जिंकल्या. भाजपच्या दडपशाहीसमोर विद्यार्थी नमत नाहीत, हे या निवडणुकीतील विजयाने दिसून आले आहे.

विद्यार्थी संघटना मजबूत करणार

गोवा विद्यापीठ निवडणुकीत ‘एनएसयुआय’ विद्यार्थी संघटनेचा विजय याला ऐतिहासिक महत्त्व आहे. २०२२ मध्ये कॉंग्रेसचा १८ ते ३५ वयोगटातील युवकांशी संपर्क काही प्रमाणात तुटला होता. या वयोगटातील युवकांचा मतांचा वाटा ३० टक्के आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थी संघटना मजबूत करण्याकडे कॉंग्रेस लक्ष देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT