Political News : Goa Forward and Congress Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसकडून गोवा फॉरवर्डला ठेंगा

सांत आंद्रे आणि काणकोण सोडण्यास काँग्रेसचा नकारच: फॉरवर्ड हतबल

दैनिक गोमन्तक

मडगाव : काँग्रेस - फॉरवर्ड युतीत सांत आंद्रे आणि काणकोण या दोन जागा गोवा फॉरवर्डला सोडाव्यात या मागणीला काँग्रेसकडून आज केराची टोपली दाखविण्यात आली. या दोन्ही जागांबद्दल काँग्रेसने गोवा फॉरवर्डला शेवटी ठेंगाच दाखविला.

सांत आंद्रे मतदारसंघात काँग्रेसने टोनी फेर्नांडिस याना तर काणकोण मतदारसंघात जना भंडारी याना उमेदवारी जाहीर केली. या दोन्ही मतदारसंघात गोवा फॉरवर्डने अनुक्रमे जगदीश भोबे आणि प्रशांत नाईक यांना उमेदवार म्हणून लोकांसमोर आणले होते. या घडामोडी नंतर भोबे यांनी फॉरवर्डला रामराम ठोकत तृणमुल पक्षात प्रवेश केला. एव्हढा मोठा आघात होऊनही गोवा फॉरवर्डवर मात्र मूग गिळून गप्प बसायची पाळी आली आहे.

गोवा फॉरवर्डने काँग्रेसकडे फातोर्डा, मये, सांत आंद्रे, काणकोण व मांद्रे अशा पाच जागा मागितल्या होत्या. त्यापैकी फातोर्डा व मये या दोन जागा त्यांना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मांद्रे मतदारसंघा बद्दल अजून निर्णय व्हायचा आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या या निर्णयावर गोवा फॉरवर्डने (Goa Forward) आज मडगावात झालेल्या पक्षाच्या बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त केल्याची माहिती पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी दिली. आम्हाला न विचारता काँग्रेसने सांत आंद्रे व काणकोण बद्दल निर्णय घेणे गैर होते असे आम्हाला वाटते असे ते म्हणाले.

आम्ही आमचे म्हणणे काँग्रेस (Congress) समोर मांडणार आहोत. भाजपला (BJP) सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसकडे युती केली आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कसल्याही तडजोडी करण्यास आम्ही तयार आहोत. पण युतीच्या दुसऱ्या पक्षांकडूनही आम्हाला तीच अपेक्षा होती असे प्रभुदेसाई म्हणाले. असे जरी असले तरी युतीत बाधा येणार नाही. कारण भाजपला सत्तेबाहेर करून गोवेकारांना चांगले शासन देणे हे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही असे त्याग करण्यास तयार आहोत असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT