मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसकडून 'हा' उमेदवार मैदानात

महादेव खांडेकरांचा पत्ता कट : लवू, मायकल, प्रसाद, भंडारी यांचाही समावेश
Dharmesh Saglani and Pramod Sawant
Dharmesh Saglani and Pramod SawantDainik Gomantak

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून पुन्हा एकदा साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या यादीतील महादेव खांडेकर यांचा पत्ता कट झाला आहे. काँग्रेस सरचिटणीस डेस्क इनचार्ज मुकुल वासनिक यांनी आज जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आज आम आदमी पक्षाने आपली चौथी उमेदवार यादी जाहीर केली असताना काँग्रेसने (Congress) तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री (CM) सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा धर्मेश सगलानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सगलानी यांनी 2017 मध्येही मुख्यमंत्र्यांना कडवी लढत दिली होती.

Dharmesh Saglani and Pramod Sawant
संभाव्य उमेदवार अस्वस्थ, 'या' चार मतदारसंघात काँग्रेसचा अजूनही सस्पेन्स

- यापूर्वी राजकीय (political) कारणास्तव चर्चेत राहिलेल्या अन्य काही नेत्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. यामध्ये कळंगुटमध्ये मायकल लोबो, मडकईमध्ये लवू मामलेदार, सांगेत प्रसाद गावकर यांचा समावेश आहे.

अन्य मतदारसंघांतील उमेदवार

डिचोली - मेघश्याम राऊत

थिवी - अमन लोटलीकर

कळंगुट - मायकल लोबो

पर्वरी - विकास प्रभुदेसाई

सांत आंद्रे - अँथनी फर्नांडिस

मडकई - लवू मामलेदार

सांगे - प्रसाद गावकर

काणकोण - जनार्दन भंडारी यांच्या नावाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com