Congress Protest in Siolim | Smriti Irani Illegal Restaurant  Dainik Gomantak
गोवा

Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीचं ‘ते’ रेस्टॉरंट बेकायदेशीरच

युवक काँग्रेस आक्रमक; आसगाव येथे हॉटेलसमोर निदर्शने

दैनिक गोमन्तक

शिवोली : केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या आसगावस्थित सिली सोल्स बार ॲण्ड रेस्टॉरन्टचा विषय आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून, त्यांना मिळालेले बार परवाने बेकायदेशीर असल्याच्या बाबींवरून आसगावच्या या रेस्टॉरन्टसमोर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करीत या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने इराणी यांच्यावरील सर्व आरोप फेटाळलेले आहेत.

मंत्री इराणी यांच्या मुलीचे उत्तर गोव्यातील आसगाव येथे सिली सिली सोल्स बार ॲण्ड रेस्टॉरन्ट आहे. हे रेस्टॉरन्ट आपलेच आहे, असे इराणी यांच्या मुलगी जोईश मुलाखतीत सांगत असल्याचे व्हिडियो उपलब्ध आहेत. याच व्हिडियोचा आधार घेत कॉंग्रेसने गोव्यापासून दिल्लीपर्यंत मंत्री इराणी यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. या रेस्टॉरन्टला मृत मालकाचा बार परवाना मिळाला आहे. याशिवाय हा परवाना रेस्टॉन्ट परवान्यापूर्वी देण्यात आला आहे. यामुळे अबकारी खात्याने त्यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावरून हा गदारोळ सुरू आहे. शनिवारी महिला कॉंग्रेसने या हॉटेलसमोर निदर्शने करीत इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

दरम्यान काल रविवारी युवक कॉंग्रेसने या हॉटेलला टाळे लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करीत टाळे लावण्यास मज्जाव केला. यावरून काही काळ वातावरण तंग झाले होते. नंतर हे टाळे आणि चावी या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आणि आपणच प्रशासनाच्यावतीने टाळे लावावे. कारण या हॉटेलमधील बहुतांश परवाने बेकायदेशीर असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसच्या ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केला आहे.

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या या हॉटेलचे परवाने बेकायदेशीरच आहेत. राज्य सरकारच्या अबकारी खात्याने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT