Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसचे मेरशीत धरणे आंदोलन

राहुल गांधी प्रकरण ः केंद्र सरकारचा नोंदवला निषेध

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द केल्याच्या निषेधार्थ सांतआंद्रे, कुंभारजुवे आणि सांताक्रुझ गट समित्यांनी मेरशी नाक्यावर धरणे आंदोलन केले. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, नेते कॅप्तान विरियातो फर्नांडिस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित केले असून त्यांची लोकसभेची सदस्यता रद्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या मैत्रीसंदर्भात संसदेत बोलल्याबद्दल गांधी यांची सदस्यता रद्द केली आहे.

आज केंद्रातील सरकार कोण चालवत असल्याचा सवाल गांधींनी केला होता. अदानींसंदर्भात 20 हजार कोटी रुपये कुठे गेले हा गंभीर आरोप त्यांनी उपस्थित केल्यानंतर सरकारचे धाबे दणाणले आणि गांधी यांची सदस्यता रद्द केली. याचा निषेध म्हणून आज हे धरणे आंदोलन केले आहे, असे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.

आज अदानींच्या फायद्यासाठी मुरगाव बंदराचे प्राधिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात आणखी एक राज्य निर्माण झाल्यासारखी स्थिती मोदी सरकारने केली आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे दुपदरीकरणासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत.

हा सर्व खटाटोप अदानींसाठी केला जात आहे, असा आरोप पाटकर यांनी केला. मोदी सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांनी मोर्चा उघडल्यानंतर त्यांच्यासंदर्भात दुष्प्रचार केला जात आहे, असे विरियातो फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Live Updates: 'इंडिगो संकटा'तही दाबोळी विमानतळाचे सुरळीत कामकाज; वाढीव कर्मचारी, गर्दी व्यवस्थापन आणि MoCA कडून कौतुक

SCROLL FOR NEXT