Congress state president Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Velsao Railway: स्थानिकांना वहिवाट हक्क देणार का? वेळसावातील रेल्वे दुपदरीकरणावरुन 'राजकारण'; पाटकरांनी सरकारला घेरले

Amit Patkar Criticizes Sawant Government: विद्यमान मुख्यमंत्री हे केंद्र सरकारचेच ऐकत असल्याने, त्यांना रेलमार्ग दुपदरीकरण पुढे नेण्यासंबंधी आदेश मिळाल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दावा अमित पाटकर यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: विद्यमान मुख्यमंत्री हे केंद्र सरकारचेच ऐकत असल्याने, त्यांना रेलमार्ग दुपदरीकरण पुढे नेण्यासंबंधी आदेश मिळाल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दावा अमित पाटकर यांनी केला. वेळसांव येथे संरक्षक भिंतीमुळे लोकांची पारंपरिक वहिवाट बंद होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना वहिवाट हक्क देणार का, यासंबंधी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

रेलमार्ग दुपदरीकरणाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी विरोध केला होता. जेथून रेलमार्ग नेण्यात येणार आहे,ती जागा राज्यसरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते,याचे स्मरण अमित पाटकर यांनी केले.

रेल्वे विकास प्राधिकरणने वेळसांवच्या एका भागात रेलमार्ग दुपदरीकरणासाठी संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पारंपारिक वाट बंद होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.आणीबाणीच्या प्रसंगी आम्ही काय करावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथे काहीजणांची धावपळ सुरु झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी वेळसांवचे माजी पंच रोकोझिन डिसौझा यांनी पाहणी करून सदर प्रश्न कुठ्ठाळीचे आमदार वाझ यांच्यासमोर मांडण्याचे आवाहन केले होते. तुम्ही आमदारांकडे येत नसल्याने सदर स्थिती उद्भवल्याचे त्यांनी स्पष्ट करून दोन व्यक्तींना लक्ष्य केले होते. त्यानंतर १४ रोजी अमित पाटकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते ओर्विल दोरादो, ओलंसियो सिमोईस तसेच काँग्रेसचे (Congress) काही पदाधिकारी तेथे पाहणीसाठी आले असता, स्थानिकांनी त्यांच्यापुढे आपली बाजू मांडली. याप्रसंगी बोलताना पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. वेळसावचा प्रश्न आम्ही येत्या विधानसभा अधिवेशनात आमच्या आमदारांमार्फत उपस्थित करणार असल्याचे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.

...तर आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल!

ज्या जागेवर रेल्वे आपला अधिकार सांगत आहे, ती त्यांची नसून ग्रामस्थांची असल्याचा दावा ओर्विल दोरादो यांनी कागदपत्रांसह केला. रेल्वेने वेळसाव भागातील कोणत्याही जमिनीचे भूसंपादन केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेने खासगी जागेत टाकलेला मातीचा भराव तेथून हटवून, जमीन पूर्ववत करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही आतापर्यंत शांततेने आमची मागणी मांडत आहोत. तथापि भविष्यात या प्रश्नाची तड न लागल्यास आम्हाला आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT