Carlos Ferreira Congress MLA
Carlos Ferreira Congress MLA  Dainik Gomantak
गोवा

Goa AAP : आमदार कार्लुस फेरेरा भाजपमध्ये दाखल होणार ?

दैनिक गोमन्तक डिजिटल

विधानसभा अधिवेशनात सरकारने बहुमताच्या जोरावर विधेयके मंजूर करून घेतली, तरीही आम्ही कडाडून विरोध केला. कोमुनिदाद दुरुस्ती कायदा व जमीन हस्तांतरणाला आम्ही विरोध दर्शविला.

परंतु काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सरकारला एकप्रकारे कायदे मंजूर करण्यास मदत केली. त्यांनी विरोध न करता त्यात सूचना सुचविल्या. त्यामुळे त्यांनी आता भाजपमध्ये दाखल व्हावे, असा उपरोधिक सल्ला आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी दिला.

‘आप’च्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रवक्ते वाल्मिकी नाईक, रामराव वाघ उपस्थित होते.

व्हिएगस म्हणाले, सरकारने एका दिवसात सात विधेयके मंजूर करून घेतली. शेतजमीन हस्तांतरण व कोमुनिदाद दुरुस्ती विधेयकांना आम्ही विरोध केला. एका बाजूला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सर्व विरोधकांना एकत्र घेऊन जातात.

दुसरीकडे आमदार फेरेरा हे सरकारला सूचना सुचवितात. त्यांनी या विधेयकांबाबत गांभीर्य दाखविले नाही. आम्ही सभापतींना या विधेयकाविषयी पुनर्विचार करावा, अशीही विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रामराव वाघ यांनीही सरकारवर टीका केली.

निवड समिती कुठे?

वाल्मिकी नाईक म्हणाले, सरकारने विधेयकांच्या अभ्यासासाठी विरोधकांना थोडी मुदत द्यायला हवी होती, ती दिली नाही. विधेयक मांडल्यावर त्यास विरोध झाला तर ते निवड समितीकडे पाठविले जाते.

परंतु सावंत सरकारच्या चार वर्षांच्या काळात ही समिती दिसलीच नाही. काँग्रेसचे आमदार वकील असल्याने ते सरकारचे ॲडव्होकेट जनरल झाले की काय, असा प्रश्‍न पडतो.

"विधानसभेत कोणी काय केले, ते सर्वांनी पाहिले आहे. विनाकारण गोंधळ घालणे किंवा दिखाऊपणासाठी धुडगूस घालणे हे न पटणारे आहे. मी जशी न्यायालयात बाजू मांडतो, तशीच विधानसभेतही मांडतो. या सर्वोच्च संस्थांचा मी सन्मान राखतो. कोणी काय बोलले, ते सर्व पाहून त्यावर मत व्यक्त करू."

- कार्लुस फेरेरा, आमदार, कॉंग्रेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Flood In Kenya: मुसळधार पावसामुळे केनियात 'हाहाकार', 42 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

SCROLL FOR NEXT