Video Viral: झगा मगा मला बघा! वधू-वर स्टेजवर फोटो काढत असताना घडलं अस की, व्हिडीओ पाहून...

Bride And Groom: महाराष्ट्रातील एका लग्नात असे काही घडले, ज्यामुळे नवरीबाईचा चेहरा भाजला आणि सर्वत्र गोंधळ उडाला.
Bride And Groom
Bride And GroomDainik Gomantak

Video Viral: 'दिन शगना दा चढेया' वर एन्ट्री... 'मेरा वाला डान्स'वर नवरदेवाचा परफॉर्मन्स आणि 'मेरे यार की शादी है'वर मित्रांचा डान्स, हे सगळं सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतं.

मात्र, व्हायरल होण्यासाठी लोक आता एक पाऊल पुढ जात आहेत. 360 डिग्री सेल्फीपासून रिव्हॉल्व्हिंग स्टेजपर्यंत वरमाळांचा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी तर नवरदेव हेलिकॉप्टरने येऊ लागले आहेत.

दरम्यान, लग्नसमारंभात फटाके किंवा स्पार्कल गनचा वापरही सर्रास वाढला आहे. पण महाराष्ट्रातील (Maharashtra) एका लग्नात असे काही घडले, ज्यामुळे नवरीबाईचा चेहरा भाजला आणि सर्वत्र गोंधळ उडाला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया...

Bride And Groom
Viral Video: बाईकवर पुढे मागे मुली, मुंबईच्या रस्त्यावर कथित 'बादशहा'चा जीवघेणा स्टंट; पोलिस म्हणाले...

#ट्विटरवर व्हायरल व्हिडिओ

या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. अदिती नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले- आजकाल लोकांना काय झालंय माहीत नाही. ते लग्नामध्ये (Marriage) पार्ट्यांसारखा थिल्लरपणा करत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि नवरदेव एकमेकांना पाठ करुन स्टेजवर उभे आहेत. दोघांच्याही हातात स्पार्कल गन आहे. केक समोर ठेवला आहे.

ते दोघे मिळून स्पार्कल गन फायर करतात. काही सेकंद चालल्यानंतर नवरीच्या हातातील स्पार्कल गन तिच्या चेहऱ्यासमोर फुटते. त्यानंतर एकच हल्लकल्लोळ उडतो.

नवरीबाई तात्काळ स्पार्कल गन सोडून मागे वळते. या व्हिडिओला ट्विटरवर 120 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Bride And Groom
Viral Video: जेव्हा 3 खंडातले कलाकार हनुमान चालीसा गातात...अंगावर शहारा आणणारा विलक्षण अनुभव...

दुसरीकडे, ही घटना केव्हा आणि कुठे घडली हे अद्याप तरी कळू शकलेले नाही. पण फटाके आणि बेशिस्त स्टंटपासून दूर का राहावे, हे लोकांनी या व्हिडिओतून शिकले पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली आहे. असा स्टंट करणेही योग्य नसल्याचे काही लोक म्हणाले.

एका यूजर्सने लिहिले की, सोशल मीडियाच्या दबावाखाली ते हे सर्व करतात.

दुसऱ्याने लिहिले की- हा मूर्खपणा आहे. पर्यावरणात आधीच अनेक धोके आहेत, त्यात आणखी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सोशल मीडिया पोस्ट फक्त दोन मिनिटांच्या असतात. ते पटकन विसरले जाते, पण आयुष्यावरील डाग कधीच दूर होत नाही.

तिसऱ्याने लिहिले की, लग्नातील सर्व विधी सोडून. बाकी सर्व काही करावे लागेल. केक कटिंग अजून व्हायचे आहे. त्याच्यासाठीही तलवार आली असावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com