Yoga for Healthy Life: ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसून पाठ अन् मान दुखते? करा हे आसन

तुम्हाला स्लिप डिस्कची समस्या जाणवत असेल तर तुम्ही योगासन करु शकता.
Health Tips | Yoga
Health Tips | YogaDainik Gomantak
Published on
Updated on

Yoga Tips For Health: ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसून पाठ मान दुखीची समस्या वाढत चालली आहे. सुमारे 80 टक्के तरुण या समस्येचा सामना करत आहेत. स्लिप डिस्कमुळे पाठ आणि मानेमध्ये तीव्र वेदना होतात.

ऑफिसमध्ये बराच वेळ एका जागी बसून काम केल्यामुळे ही समस्या अनेकांना जाणवते. अनेक तरुण स्लिप डिस्कच्या समस्येवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही योगासन करु शकता. रोज योगासने केल्यास स्लिप डिस्क ही समस्या कमी होउ शकते.

  • भुजंगासन

सूर्य नमस्कारामधील आठवे आसन म्हणजे भुजंगासन. भुजंगासनाला कोबरा आसन, असेही म्हणतात. या आसनामध्ये प्रथम पोटावर झोपून नंतर पाठ वर वाकवावी. यामुळे पाठदुखी कमी होते. 

  • भुजंगासन करण्याची पद्धत

सर्वप्रथम जमीनीवर पालथे झोपा. 
हनुवटी छातीला टेकवा 
कपाळ जमिनीला टेकवा. 
हाताचे पंजे छातीजवळ ठेवा. त्यानंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन कमरेपपासूनचा भाग वर उचला. 

Bhujangasana
BhujangasanaDainik Gomantak
Health Tips | Yoga
Vastu Tips For Home: गॅलरीत टांगा 'या' वस्तू, घरातील कलह होईल दूर
  • शवासन

सर्व आसन केल्यानंतर सर्वात शेवटी शवासन करावे. शवासनामुळे शारिरीक आणि मानसिक थकवा जाणवणार नाही. तसेच मानदुखी आणि पाठदुखीची समस्या देखील शवासनामुळे कमी होते. 

शवासन करण्याची पद्धत

  • पाठीवर झोपा

  • आपले हात आणि पाय बाहेर शरीरापासून दूर पसरवा

  • डोळे हळूवारपणे बंद करा.

  • शरीराची हालचाल करु नका. कोणताही विचार करु नका. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा.

तसेच तुम्ही रोज 20 मिनिटे चालणे, सायकल चालणे, डान्स करणे, झुंबा करणे,  स्कॉट्स मारणे इत्यादी गोष्टी देखील करु शकता. यामुळे तुम्हाला पाठदुखी आणि मानदुखी या समस्या जाणवणार नाहीत. काम करताना पाच मिनीट ब्रेक घेऊन तुम्ही वॉक घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पाठदुखीची समस्या जाणवणार नाही. 

Health Tips | Yoga
Health Tips | YogaDainik Gomantak
  • उष्ट्रासन

उष्ट्रासन या आसनाला कॅमल पोज असं देखील म्हटलं जातं.  उष्ट्रासन करण्यासाठी तुमचे हात मागील बाजूला करुन पायांच्या टाचांना लावावेत.

Health Tips | Yoga
Health Tips | YogaDainik Gomantak
  •  शलभासन

शलभासन हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. ज्यामध्ये “शलभा” या शब्दाचा अर्थ “टोळ किंवा कीटक” आणि दुसरा शब्द आसन म्हणजे “मुद्रा”, होय.

Health Tips | Yoga
Health Tips | YogaDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com