Congress Media Cell President Divya Kumar Criticized BJP Dainik Gomanatk
गोवा

‘मोदी का परिवार’चं घोटाळेबाज आणि फसवणूक करणाऱ्यांशी साटंलोटं; पतंजलीच्या प्रकरणावरुन काँग्रेसचा भाजपवर घणाघात

Congress Media Cell President Divya Kumar Criticized BJP: पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Manish Jadhav

Congress Media Cell President Divya Kumar Criticized BJP: पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. योगगुरु रामदेव आणि पतंजली आयुर्वेदाचे एमडी आचार्य बाळकृष्ण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही योग्य प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल फटकारले.

यातच आता, काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी या प्रकरणावरुन भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कुमार म्हणाले की, ''गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या आयूष मंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीशी संगनमत केल्याबद्दल फटकारले.'' ‘मोदी का परिवार’ घोटाळेबाज आणि फसवणूक करणाऱ्यांशी साटेलोटे करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी जहरी टीका कुमार यांनी केली.

दरम्यान, पतंजलीने प्रकाशित केलेल्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर प्रतिक्रिया देताना कुमार यांनी भ्रष्टाचारी भाजप सरकारवर सडकून टीका केली. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, कुमार यांनी भाजप कार्यकर्ते आणि प्रचारक स्नेहा भागवत, शेफाली वैद्य, रुपेश कामत आणि गिरीराज पै वेर्णेकर यांना टॅग करुन "कुछ तो बोलो" असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली.

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांचा माफीनामा स्वीकारण्यास नकार दिला. देशवासीयांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे अशी टिपण्णी न्यायालयाने केली. पतंजलीने सर्व मर्यादा ओलांडल्या असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले, असेही कुमार यांनी पुढे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले. कोरोनादरम्यान ॲलोपॅथी हा पर्याय ठरु शकत नाही असा अप्रचार पतंजलीने केला. मात्र, यादरम्यान केंद्र सरकार डोळे मिटून का बसले होते? अशी विचारणा देखील आज सर्वोच्च न्यायालयाला करावी लागली, असेही कुमार पुढे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची सामान्य लोकांप्रती बेफिकीर आणि असंवेदनशील वृत्ती समोर आली आहे. भाजपने गेल्या 10 वर्षांत पतंजली सारख्या उद्योगांना लोकांच्या जीवाशी खेळण्याची मूभा दिली, असा घणाघात यावेळी बोलताना कुमार केला. गोमंतकीयांनी भाजपचा खरा रंग ओळखून आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन कुमार यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT