Goa ZP Election Result 2025 Live Update: मायकल लोबोंना धक्का; कळंगुटमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

North And South Goa ZP Election 2025 Result Live Update In Marathi: उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांचा निकाल आज (२२ डिसेंबर) जाहीर होणार आहे.
Goa ZP Election 2025 Result Live Update
Goa ZP Result Live UpdateDainik Gomantak

मायकल लोबोंना धक्का; कळंगुटमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

कळंगुट जिल्हा पंचायत जागेवर काँग्रेसचा उमेदवार ५४२ आघाडीवर असून, भाजप उमेवार पिछाडीवर पडला आहे. काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याने हा लोबोंसाठी काहीसा चिंतेचा विषय ठरत आहे.

कवळे मतदारसंघ निकाल; महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा उमेदवार आघाडीवर

कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा उमेदवार ३५५८ मतांसह आघाडीवर आहे. तर आरजीपीच्या उमेदवाराला १,१२९ मते मिळाली आहे

लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी

लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण. पोस्टल मते धरून भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु.

सत्तरीतून पहिला कल हाती; होंडा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर

सत्तरी तालुक्यातून पहिला कल हाती आला आहे. होंडा जिल्हा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर आहेत. तर, काँग्रेस पिछाडीवर आहेत.

Goa Zilla Panchayat Election Results 2025 LIVE: जिल्हा पंचायत निवडणूक भाजपसाठी लिटमस टेस्ट

जिल्हा पंचायत निवडणूक ही भाजपसह इतर पक्षांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील अनेक समीकरणं ठरणार आहेत.

Goa ZP Election Result: गोव्यात कोण बाजी मारणार? मतमोजणीला सुरुवात

गोवा जिल्हा पंचायतीसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान पार पडले. यानंतर आज पंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी आज (२२ डिसेंबर) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सत्तरी, डिचोलीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून ५० मतदारसंघात २२६ उमेदवार रिंगणात आहेत. यास १५ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी ६०० कर्मचारी तर १,२०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com