BJP state president  Sadanand Shet Tanawade
BJP state president Sadanand Shet Tanawade  Dainik Gomantak
गोवा

मडकई मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

दैनिक गोमन्तक

पणजी: मडकई मतदारसंघांमध्ये (Marcaim Constituency) भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्याच्या इराद्याने भाजपाने (BJP) काम सुरू केले असून काँग्रेसचे (Congress) मडकई मतदारसंघाचे माजी गट अध्यक्ष असलेले विनोद पोकळे यांना आज भाजपात प्रवेश देण्यात आला. पणजी (Panajim) येथील भाजपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी विनोद पोकळे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. याप्रसंगी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर (Vinay Tendulkar) उपस्थित होते. पोकळे यांच्या भाजप प्रवेशामुळे मडकईत भाजप मजबूत होणार आहे . आपण त्यांचे भाजपामध्ये स्वागत करत आहे. असे प्रतिपादन खासदार विनय तेंडुलकर यांनी यावेळी केले .

मडकई मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी प्रमुख असलेले विनोद पोकळे यांच्या भाजपा प्रवेशामुळे मडकईत भाजपचा जनाधार वाढणार असून या तदारसंघातील विजयासाठी पोकळे यांचा प्रवेश निश्चित लाभदायक ठरणार असल्याचे तानावडे म्हणाले .

वीस वर्षांपूर्वी श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्यासोबत मडकई मतदारसंघात काम केले होते . त्यावेळी श्रीपाद नाईक विजयी झाले होते. त्यानंतर आपण काँग्रेससाठी गेली वीस वर्षे काम केले. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशपातळीवर केलेली कामे आणि लोकांचा केलेला विकास त्याचबरोबर गोव्यामध्ये भाजपचे चालू असलेले काम पाहून वीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपण भाजपमध्ये दाखल झालो आहे. वीस वर्षापूर्वी जसा श्रीपाद नाईक यांनी मडकईमध्ये भाजपचा झेंडा फडकावला होता, तसाच 2022 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा मडकईत फडकावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे विनोद पोकळे यांनी यावेळी सांगितले . काँग्रेसच्या एकूणच कारभारावर यावेळी पोकळे यांनी टीका केली व भाजपाचे सरकार पुढील पंचवीस वर्षे सत्तेवर राहावे. यासाठी सर्वांनी काम करावेत असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Goa Film City: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

SCROLL FOR NEXT