Sankalp Amonkar | Congress Updates  Dainik Gomantak
गोवा

Sankalp Amonkar : मुख्यमंत्री सावंत यांचा ‘तो’ दावा खोटा

‘हर घर जल’ योजना फसवी असल्याचा संकल्प आमोणकर यांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Sankalp Amonkar : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा 100 टक्के ‘हर घर जल’ हा दावा खोटा आहे. आम्ही डॉ. प्रमोद सावंत यांना हा दावा सिद्ध करण्याचे आव्हान देतो. मुरगाव मतदारसंघातील ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. गोव्याच्या बहुतांश भागांमध्ये फक्त नळ आहेत; पण पाणी नाही. त्यांचा दावा ‘100 टक्के उघड्यावर शौचमुक्त गोवा’, या दाव्यासारखाच फसवा आहे, अशी टीका मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गुरुवारी केली.

रोपवाटप कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमोणकर म्हणाले की, मुरगावात ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. मुरगावात फक्त नळ आहेत; पण पाणी नाही. गोव्याच्या अनेक भागांमध्ये अशी स्थिती आहे, की जिथे लोक पाण्यासाठी संघर्ष करतात. गोव्यात नळ असण्याचा काहीच अर्थ नाही; कारण नळाला पाणीच नाही.

सडा, बोगदा आणि जेटी भागात लोकांना कधीतरीच पाणी मिळते, तेही फक्त एका तासासाठी. त्यासाठी पहाटे उठावे लागते. मी कोणत्याही दिवशी मुख्यमंत्र्यांसमोर ते सिद्ध करू शकतो. मतदारसंघातील शेकडो घरे दाखवू शकतो, जिथे नळच नाहीत. नळजोडणीसाठी साबांखा आणि पालिकेकडून वेगवेगळ्या एनओसीची मागणी करत लोकांना त्रास दिला जातो. भाजपने निवडणुकीपूर्वी मोफत पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले होते; पण ते खोटे आहे. आता लोकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची बिले मिळाली, ती बिले लोक भरू शकत नाहीत.

केंद्रीय मंत्र्यांनी ग्राउंड रिॲलिटी तपासावी

‘हर घर जल’ या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी रिट्विट केले. सर्व राज्यांनी गोव्याचा आदर्श घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. पण शेखावतजींनी मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर भाष्य न करता ग्राउंड रिॲलिटी तपासावी, असेही आमोणकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT