Panjim: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'पायलट' म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यातील मोटरसायकलने बांबोळी ते पणजीतील आझाद मैदानापर्यंत प्रवास केला. Dainik Gomantak
गोवा

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ‘सवारी’!

प्रशांत नाईक : राहुल गांधींचे सारथी बनलेल्या मोटरसायकल पायलटचे भावोद्गार

सचिन कोरडे

पणजी: जीवनात असा क्षण येतो ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. असाच एक क्षण अनुभवला तो भाटले पणजी (Panjim) येथील प्रशांत कांता नाईक (Prashant Naik) यांनी. एक पायलट म्हणून 25 वर्षे सेवा बजावणाऱ्या प्रशांत यांना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना प्रवासी म्हणून मोटरसायकलवर वाहून नेण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असून ती आतापर्यंतची ‘बेस्ट सवारी’ असल्याची प्रतिक्रिया प्रशांत यांनी ‘गोमन्तक’ शी बोलताना व्यक्त केली.

वेळसाव येथील मच्छीमारांच्या समस्या समजून घेतल्यानंतर राहुल गांधी हे आझाद मैदानावर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार होते.

बांबोळी येथून त्यांनी मोटरसायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तशी व्यवस्था केली. यासाठी प्रशांत यांची निवड झाली. कदाचित, प्रशांत यांना कल्पनाही नसेल की, राहुल गांधी हे एक प्रवासी म्हणून मोटरसायकलहून प्रवास करतील म्हणून. हा प्रशांत यांचाच सन्मान नव्हता तर संपूर्ण व्यवसायाचा सन्मान होता, असे प्रशांत यांना वाटते. ‘पात्रांव, खंय पावोंव’ या राहुल गांधींना विचारलेल्या प्रश्‍नावर प्रशांत यांना आश्चर्याचा धक्का बसला.

तो 7 किमीचा प्रवास; व्हीआयपीचा फिल

मी बांबोळीला होतो. तेथेच मला राहुल गांधी यांना आझाद मैदानावर न्यायचे आहे, असे सांगण्यात आले. सुरुवातीला विश्वास बसला नाही. नंतर मात्र राहुल स्वत: मोटरसायकलजवळ आले. हातात हात दिला. कैसे हो..असे विचारले. सगळे काही अचानक घडल्यासारखे झाले. मी त्यांना घेऊन आझाद मैदानाकडे निघाले. 7 किमीचा हा प्रवास कधीही न विसरण्यासारखा आहे. या प्रवासात त्यांनी माझ्याशी बातचीतही केली. आमच्या गाडीमागे मोठा ताफा होता त्यामुळे मलाही व्हीआयपी असल्यासारखे वाटत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT