भाजपचे खासदार तेजस्‍वी सूर्या यांचे TMC वर 'सनसनाटी' आरोप..

पश्‍चिम बंगालमध्‍ये निरपराध लोकांचे विशेषत: विरोधकांचे दिवसाढवळ्‍या मुडदे पाडले जातात..
Goa Politics : BJP MP Tejasruvi Surya's 'sensational' allegations on TMC
Goa Politics : BJP MP Tejasruvi Surya's 'sensational' allegations on TMCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा हे ‘पॉलिटिकल (Goa Politics) टुरिझम’ बनले असून ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee), राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच आम आदमीचे नेते येथे येऊ लागले आहेत. पण भाजपला (BJP) काही फरक पडत नाही. कारण याच पक्षाकडे विकासाचे निश्‍चित धोरण आहे. त्‍यामुळे गोव्‍यात भाजपचा विजय पक्का आहे, असा विश्‍‍वास भाजपचे खासदार तथा राष्‍ट्रीय युवा मोर्चा अध्‍यक्ष तेजस्‍वी सूर्या यांनी आज येथे पक्षाच्‍या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्‍यक्त केला. करप्‍शन, माफियाराज आणि दहशतवाद या त्रिसूत्रींवर ममतांचे सरकार चालते, असा सनसनाटी आरोपही त्‍यांनी केला.

Goa Politics : BJP MP Tejasruvi Surya's 'sensational' allegations on TMC
शिक्षकांनी धुडकावले मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ममता बॅनर्जी गोमंतकीयांची दिशाभूल करत आहेत. पश्‍चिम बंगालमध्‍ये निरपराध लोकांचे विशेषत: विरोधकांचे दिवसाढवळ्‍या मुडदे पाडले जातात. या हिंसक कारवायांना मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच फूस असते हे आता लपून राहिलेले नाही. आता गोव्‍याकडे त्‍यांची वक्रदृष्‍टी वळली आहे. गोमंतकीयांनी त्‍यांच्‍यापासून साधव रहावे, असा इशाराही सूर्या यांनी दिला. दरम्‍यान, या पत्रकार परिषदेला प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

इंधन दरवाढीला विरोधकच जबाबदार

देशातील वाढत्‍या इंधन दरवाढीला विरोधक सरकारला जबाबदार धरत आहेत. परंतु तेच खरे या गोष्‍टीला जबाबदार आहेत. कारण इंधन जीएसटीअंतर्गत आणण्‍यास त्‍यांचा विरोध आहे. जर ते जीएसटीअंतर्गत आले तर पेट्रोल-डिझेलचे दर खूपच खाली येतील. याबाबत जनतेनेच आता विरोधकांना जाब विचारावा, असे सूर्या म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com