Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: राज्यात अवैध व्यवसाय फोफावले; गोवा काँग्रेसचे राज्य सरकारवर टीकास्त्र

सत्ताधारी आमदारांना वाळू उत्खनन करण्याची परवानगी आहे - मोरेनो रेबेलो

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात अवैध व्यवसाय फोफावले असून यामूळे सरकार अपयशी ठरले आहे. असे गोवा काँग्रेस नेते रिबेलो मोरेन यांनी म्हटले आहे. आज गोवा काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

(Congress leader Moreno Rebello told MLA are allowed to violate laws of Sand Mining)

यावेळी बोलताना काँग्रेस नेते रिबेलो मोरेन म्हणाले, गोवा राज्यात अवैध वाळू उपसा प्रकरणे मोठ्या प्रमाणात सुरू असून यात राज्यातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनाच फायदा होत आहे. वाळू उपसा प्रकरणे वाढली तरी गोवा सरकार वाळू उपसा आणि त्या संदर्भात नियमावली तयार का करत नाही? याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून ठराविक वर्गाला याचा फायदा व्हावा हा त्यामागचा हेतू असल्याचे मोरेन म्हणाले.

वाळू उपसाबाबत न्यायालयाचे आदेश दिले असतानाही याबाबत ठराविक अशी नियमावली तयार केली का जात नाही? त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी त्यांनी गोव्यातील जनतेला आव्हान केले आहे की, अशा प्रकरणांबाबत तुम्ही सतर्क राहून या व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे अन्यथा हे शोषण सुरूच राहील.

यावेळी काँग्रेस नेते संजय बर्डे नरकासुर ऐवजी या शासनाला सरकारआसुर असे म्हणावे लागेल, कारण त्या नरकासुराप्रमाणेच यांची कृती असल्याचे आहे. असे ते म्हणाले. सामान्य जनतेच्या हितासाठी काम करणे गरजेचे असताना गोव्यातील सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला.

मंत्री निलेश काब्राल यांच्या मतदारसंघात एका सिनेमाप्रमाणे बंदुकीतून गोळ्या झाडल्या गेल्याचा प्रकार समोर आला आणि अशा व्यक्ती नेत्यांसोबत फोटोमध्ये दिसतात ही दुर्दैवाची बाब आहे. त्याच्यामुळेगोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची ते म्हणाले. गोव्यातील नेत्यांना दिल्लीतून सूचना येतात त्याप्रमाणे ते गोव्यात रणनीती आखत असतात, म्हणूनच दोन अधिक दोन चार ऐवजी जरी वरिष्ठ नेत्यांनी 10 म्हटले तर गोव्यातील नेते 10 म्हणतात आणि यातच गोवेकरांचा तोटा असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

SCROLL FOR NEXT