म्हापसा येथील नवीन बसस्थानकावर जीवघेणा हल्ला केल्याने दोघे जखमी झाल्याची घटना दिनांक 28 ऑक्टोबर रोजी घडली. चंद्रकांत शिरोडकर व पुत्र ब्रिजेश शिरोडकर हे पिता-पुत्र म्हापसा येथील बसस्थानकावर येत असताना त्यांच्यावर सुरीहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
( Mapusa court remands 5 days police custody to 2 persons for murder attempt )
मिळालेल्या माहिती नुसार ही घटना 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. जखमी चंद्रकांत शिरोडकर व पुत्र ब्रिजेश शिरोडकर हे आपल्या पर्यटक टॅक्सीतून म्हापसा येथे नवीन कदंब बसस्थानकावर पर्यटकांना सोडण्यासाठी आले होते. यावेळी संशयितांनी अचानक आपली दुचाकी शिरोडकर पिता-पुत्राच्या कारसमोर घेतली. त्यामुळे कारची धडक या दुचाकीला बसली.
यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत नुकसान भरपाईची मागणी केली व समीर पेडणेकर याने ब्रिजेश शिरोडकर याच्यावर सुरीहल्ला केला. त्याच्या छातीवर व तोंडावर सुऱ्याचे घाव पडले आहेत. तर मुलाला वाचविण्यासाठी आलेल्या चंद्रकांत शिरोडकर यांच्या पाठीवरही संशयितांनी सुऱ्याचे वार केले. या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पाच दिवसानंतर पुढील सुनावणी पार पडणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.