Girish Chodankar From Congress Party Dainik Gomantak
गोवा

Goa Lok Sabha Election 2024: मोदीलाटेचा प्रभाव दिसतच नाही! - गिरीश चोडणकर

Goa Lok Sabha Election 2024 | Congress over BJP Candidate: गिरीश चोडणकर यांचे मत : भाजप कार्यकर्तेच सरकारवर नाराज, रोज नवनवीन नावे पुढे

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election 2024:

लोकसभेच्या निवडणुकीत मोदीलाटेचा प्रभाव असणार, असे जे म्हटले जाते त्यात काही तथ्य नाही. जर मोदीलाट असती तर भाजपने उत्तर गोव्याच्या उमेदवारीसोबतच दक्षिण गोव्याची उमेदवारीही तत्काळ जाहीर केली असती. भाजपकडे उमेदवार नाही. रोज नव-नवीन नावे पुढे केली जात आहेत, असे मत कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी मांडले.

भाजपचे मूळ कार्यकर्तेच आज नाराज आहेत. त्यांचा संपर्क पक्षापासून तुटला असून त्यांना राज्यातील सरकार आपले असे वाटत नसून अनेकजण आमच्यासोबत असल्याचा दावा कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. ते गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी गोमन्तक टिव्हीवर घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भाजपने आमचे दोनदा आमदार पळविले; परंतु आमचा मतदार आमच्यासोबत आहे. जेथे भाजपची सत्ता आहे तेथील विरोधी पक्षाला कमजोर करण्याचे काम केले जात आहे. वाजपेयी सरकार आणि मोदी सरकार यात फरक आहे, असे चोडणकर म्हणाले.

राज्याच्या अस्तित्वाचा मुद्दा

गोव्यात पक्षीय राजकारणापेक्षा राज्याचे अस्तित्व राखून ठेवण्याचा मुद्दा आघाडीवर आहे. मी मागील वर्षभर दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी भेटी दिल्या. अनेकांशी चर्चा केली. काही ख्रिस्ती धर्मगुरूंशी संवाद साधला असता गोव्याचे अस्तित्व राखण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, त्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्या सर्वांचे मत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

बुथस्तरीय कामाला सुरुवात

आमचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि युरी आलेमाव यांच्या नेतृत्वात पक्षाची पुनर्बांधणी होत आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये बुथस्तरीय कामाला सुरवात झालेली आहे. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपला सर्व फंड कामी लावला. लोकसभेत प्रश्‍नही मांडले. त्यांचा जनसंपर्कदेखील आहे; परंतु त्यांनी प्रसिद्धी केली नाही, असे चोडणकर म्हणाले.

...तर मी निवडणूक रिंगणात !

कॉंग्रेसने दक्षिण गोव्यातील लोकसभेची उमेदवारी ही अल्पसंख्याकांना दिली आहे. कॉंग्रेसची विचारसरणी ही अल्पसंख्याकांच्या उत्कर्षाची आहे. त्यामुळे फ्रान्सिस सार्दिन, विरियातो फर्नांडिस, एल्विस गोम्स यांची नावे आघाडीवर आहेत.

मी माझ्या अर्जात म्हटले आहे की, दक्षिणेची उमेदवारी अल्पसंख्याकांना दिली तर त्याला पूर्णतः पाठिंबा असेल; परंतु जर काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर उमेदवारीसाठी तयार असल्याचे केंद्रीय नेतृत्वाला कळविल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: फिन ॲलनचं वादळ! दिल्लीच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत ठोकलं शतक; केकेआरच्या 'सिक्सर किंग' क्लबमध्ये मारली धडक

खरी कुजबुज: सामान्यांची सरकारला कदर नाही का?

West Bengal Victory: सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू सरकार; तामिळनाडूत विजय सत्तेच्या जवळ

Goa Crime Highest: महिलांवरील अत्याचारात 'गोवा' अव्वल; पोलिसांकडून खंडन; ‘एनसीआरबी’च्‍या अहवालाने राज्‍यभर खळबळ

New CDS Of India: भारताला मिळाले नवीन सीडीएस! लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणि यांची नियुक्ती; जनरल अनिल चौहान यांच्यानंतर सांभाळणार तिन्ही दलांची धुरा

SCROLL FOR NEXT