Junta House Panaji Goa365
गोवा

Junta House Panaji: 'जुन्ता हाऊस' धोकादायकच, स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी? चोडणकरांचा सवाल

Girish Chodankar: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जुन्ता हाऊस ही धोकादायक इमारत सरकारनेच जाहीर केली आहे, तर तिचे स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी असा सवाल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Junta House Panaji Structural audit

पणजी: अनेक सरकारी कार्यालये असलेल्या पणजी येथील जुना हाउसचे स्ट्रक्चरल ऑडिट राज्य सरकार करणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट आणि नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी) पूर्ण करण्यासाठी सरकार ११ लाख रुपयांहून अधिक खर्च करणार आहे, त्यावर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आक्षेप घेतला आहे. जुन्ता हाऊस ही धोकादायक इमारत सरकारनेच जाहीर केली आहे, तर तिचे स्ट्रक्चरल ऑडिट कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी बोलीदारांना काही दिवसांपूर्वी आमंत्रित केले आहे आणि निवडलेल्या बोलीदाराने १५ दिवसांच्या आत ऑडिट पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सरकारी इमारतींची दुरवस्था झाली आहे. जुन्ता हाऊस ही इमारत एकेकाळी सरकारच्या प्रशासकीय कार्यालयांची इमारत म्हणून ओळख होती, परंतु या इमारतीतून अनेक कार्यालयांचे स्थलांतर झाले आहे. आता काही मोजकीच कार्यालये या इमारतीत आहेत व त्यात परिवहन खाते हे प्रमुख कार्यालय आहे.

११ लाख रुपये कमी नव्हे !

जुन्ता हाऊस ही सर्वात जुनी सरकारी इमारत आहे, या इमारतीच्या सुरक्षेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे म्हणजे केवळ भ्रष्टाचारासाठी शोधलेला नवा उपाय आहे, असे स्पष्ट दिसते. ११ लाख रुपये ही काही कमी रक्कम नाही, असेही चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: सावधान! गोव्यातील 'या' रस्त्यावर गाडी लावल्यास होणार कारवाई; स्थानिकांना पार्किंग सोय करणे बंधनकारक

Chhath Puja History: राम-सीतेची निष्ठा, पांडवांचे यश: 'छठ पूजा' श्रद्धेचा आणि शक्तीचा प्राचीन वारसा

Horoscope: कष्टाचे चीज होईल, कामात थोडा ताण जाणवेल तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

SCROLL FOR NEXT