Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसच्या कुशावती जिल्हा अध्यक्षांचा काणकोणात दौरा; पक्ष संघटना बळकट करण्यावर भर

Rajesh Vernekar Congress Meeting Canacona: काँग्रेसचे कुशावती जिल्हा अध्यक्ष राजेश वेर्णेकर यांनी काणकोण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी चर्चा केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

काणकोण: काँग्रेसचे कुशावती जिल्हा अध्यक्ष राजेश वेर्णेकर यांनी काणकोण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी चर्चा केली. यावेळी गटसमिती मजबूत करून ती अधिक मतदाराभिमुख करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या भेटीत त्यांनी २०२७ च्या निवडणुकीसाठी काणकोण मतदारसंघातील नियोजनावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजातील काही नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा या समाजासोबत राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी काँग्रेसचे कॅडिडो डिसोझा, पिटर फर्नांडिस (क्लस्टर इन्चार्ज), पक्षाचे माजी उमेदवार जनार्दन भंडारी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वैष्णव पेडणेकर, दक्षिण गोवा युवा अध्यक्ष प्रलय भगत, महिला मोर्चा अध्यक्ष उर्सिला कोस्ता, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हर्ष देसाई, श्रीस्थळचे माजी सरपंच रामू नाईक, खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर, काणकोण अल्पसंख्याक गटाचे अध्यक्ष गास्पर कुतिन्हो तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT