Goa Politics Dainik Gomantak
गोवा

'जिंकून आल्यावर भाजप सरकारला पाठिंबा देणं हाच काँग्रेसचा डीएनए'

गोव्यात काँग्रेसच्या 17 पैकी 15 आमदारांनी दुसऱ्या पक्षात जाऊन पक्षांतराचा जागतिक विक्रम केला आहे; आप

दैनिक गोमन्तक

मडगाव : काँग्रेसच्या उमेदवरीवर जिंकून आल्यानंतर भाजप सरकारात सामील होणे हाच काँग्रेसचा डीएनए बनला आहे. काल हे मेघालयात घडले उद्या हे निश्चितच गोव्यात घडेल असे प्रतिपादन आपच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी केले.

चार राज्यात निवडणूक (Election) होत असताना काल मेघालयात 5 काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे, त्या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आतिशी यांनी मायकल लोबो, आवेर्तन फुर्तादो या सारख्या यापूर्वी भाजप (BJP) सरकारात मंत्री असलेल्याना काँग्रेसने (Congress) उमेदवारी दिली आहे.

सांताक्रूझचे काँग्रेस उमेदवार रुडॉल्फ फेर्नांडिस हे भाजपचे पणजीचे उमेदवार बाबुश मोन्सरात यांचे उजवे हात मानले जायचे. हे उमेदवार उद्या जिंकून आले तर भाजपात जाणार नाहीत कशावरून असा सवाल करीत गोव्यात काँग्रेसच्या 17 पैकी 15 आमदारांनी दुसऱ्या पक्षात जाऊन पक्षांतराचा जागतिक विक्रम केला आहे ते विसरू नये असे त्या म्हणाल्या.

फक्त गोवा आणि मेघालयातच नव्हे कर्नाटक, मेघालय, मध्यप्रदेश येथेही हेच झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला फक्त भाजप सरकार बनवून द्यायला आवडते हे सिद्ध झाले आहे. गोव्यात सासष्टीत भाजपला स्वतःच्या ताकदीवर निवडून येणे शक्य नाही हे माहीत आहे.

त्यामुळेच त्यांनी आवेर्तन फुर्तादो, चर्चिल आलेमाव या सारख्याना दुसऱ्या पक्षाची उमेदवारी देऊन पुढे आणले आहे. जे जिंकून आले तर पुन्हा भाजपातच जातील असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांच्या बरोबर आपचे नुवेचे उमेदवार डॉ. मारियान गुदिन्हो, नावेलीच्या उमेदवार प्रतिमा कुटीन्हो तसेच बाणावलीचे उमेदवार व्हेंझी व्हिएगस हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT