गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरात प्रचार करत आहेत. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या दोघांनीही भाजप उमेदवारांचा प्रचार केला. गोव्यातील विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ अमित शहा (Amit Shah) यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. त्याचवेळी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिवसभर प्रचार केला.
यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस (Congress) सरकारवर निशाणा साधला, 2013-14 च्या आर्थिक बजेटमध्ये कॉंग्रेस सरकारने गोव्याला फक्त 432 कोटींचा निधी दिला होता. आज भाजप (BJP) सरकारने गोव्याला 2567 कोटींचा निधी दिला आहे. कॉंग्रेसने गोव्याला आझादी देताना पण अन्याय केला आणि विकासाच्या बाबतीत देखील मागे ठेवले. मात्र भाजप सरकारने अटल सेतू बांधला, जुवारी पूल उभारला, राज्यात दुसरे मोठे विमान तळाची निर्मिती केली. 2009 ते 2014 पर्यंत गोव्यातील रस्त्यांसाठी कॉंग्रेसने फक्त 120 कोटींचा निधी दिला. त्यामुळे कॉंग्रेसने फक्त गोव्यावर अन्याय केला. अस मत शहा यांनी मांडले. तसेच मात्र भाजपसरकारने 2014 ते 2020 या कालावधीत गोव्याला 2500 कोटींचा निधी फक्त रस्ते बांधण्यासाठी दिला आहे.
दरम्यान, युवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या सरकारने गोव्यात उद्योग व्यवसायाला चालना दिली आहे. तसेच अनेक विकास कामे केली आहेत. घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहचवण्याच काम गेल्या 10 वर्षात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले आहे. तसेच प्रत्येक शाळेत स्वच्छ:ता गृह उभारली आहेत. तसेच कचऱ्याचा प्रश्न भाजप सरकारने सोडवला आहे. यासाठी घरोघरी कचरा गाड्या येत आहेत. कोरोना महामारी पाहता प्रमोद सावंत यांनी लसीकरणाला सुरुवात करून लसीकरण मोहीम यशस्वी केली आणि आज तिसऱ्या लाटेत गोवा सुखरूप आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.