पणजी : राज्यातील काँग्रेस सरकारचा इतिहास पाहिल्यास सांताक्रुझच्या काँग्रेसच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला. त्यामुळे तो महाभयंकर दुष्ट पक्ष आहे जो आपल्या कार्यकर्त्यांनाही सोडत नाही.
सांताक्रुझमध्ये भाजप मेळाव्यात भरपावसातही झालेली गर्दी पाहून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पहिल्यांदाच कमळ फुलणार हे निश्चित आहे. त्यामुळे राज्यात २०२७ मध्ये २७ आमदार जिंकून आणण्यासाठी घाबरण्याची गरज नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांताक्रुझ मतदारसंघातील भाजप मेळाव्यात बोलताना केले.
या भाजप मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार रुदॉल्फ फर्नांडिस, सिद्धार्थ कुंकळ्ळकर, अनिल होबळे तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष सर्वेश शिरोडकर तसेच इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजपने कधीच जातीधर्मावर मतभेद केले नाहीत. त्यामुळे सांताक्रुझ आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून मोठा विकास या मतदारसंघात झाला आहे. सरकारचे त्यांना सहकार्य आहेच, लोकांनीही सहकार्य द्यावे.
१३ फ्लॅक्सी कार्यक्रमांतून योजना जारी करणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत. या योजनांपैकी ८० टक्के योजना गोव्यात १०० टक्के लोकांपर्यंत पोहचल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले.
सांताक्रुझमध्ये कचरा समस्या आहे. त्यामुळे लोकांनी रस्त्याच्या बाजूने कचरा टाकू नये. पंचायतीने कचऱ्यांची विल्हेवाट लावावी. आमदार प्रयत्न करतीलच, लोकांनी ठरवले तर सांताक्रुझ सर्वोत्कृष्ट मतदारसंघ होण्यास वेळ लागणार नाही. आमदार फर्नांडिस हे चांगले काम करत आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.