Sanquelim: भारत POK ताब्यात घेणार! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास; साखळी तिरंगा यात्रेत 'वंदे मातरम'चा जयजयकार

Sanquelim Tiranga Yatra: मुख्यमंंत्री म्हणाले की, भविष्यात भारत दहशतवादाला कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही, तसेच दहशतवादाला समर्थन देणाऱ्यालाही योग्य ते शासन करणार आहे.
Sanquelim Tiranga Yatra, CM Pramod Sawant
Sanquelim Tiranga Yatra, CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: भारताची लढाई ही केवळ दहशतवादाविरोधात असून कोणत्याही देशाशी किंवा कोणत्याही जात व धर्माविरोधात नाही. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत देशाने उचललेल्या पावलाला समस्त देशवासीयांनी तसेच गोमंतकीयांनीही पाठिंबा दिला आहे. भारत केवळ ३७० कलम रद्द करूनच गप्प राहणार नाही, तर ‘पीओके’ सुद्धा मिळवणार, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. ते साखळी येथे नागरिकांनी काढलेल्या तिरंगा यात्रेत बोलत होते.

साखळी नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत प्रमोद सावंत यांच्यासह नगरपालिकेतील नगरसेवक, साखळी मतदारसंघातील सर्व पंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sanquelim Tiranga Yatra, CM Pramod Sawant
Goa CM: ऑपरेशन सिंदूर यशस्वी! देशातील देशद्रोह्यांना जागा दाखवण्याची गरज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंंत्री म्हणाले की, भविष्यात भारत दहशतवादाला कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही, तसेच दहशतवादाला समर्थन देणाऱ्यालाही योग्य ते शासन करणार आहे. भारताच्या कृतीला समस्त देशवासीयांनी तसेच गोमंतकीय व साखळीतील लोकांनीही भरभरून पाठिंबा दिला आहे व भारतीय सैन्याचे मनोबल वाढविले आहे.

Sanquelim Tiranga Yatra, CM Pramod Sawant
Goa Stampede: शिरगाव दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन हेल्पलाईन सक्रिय; CM सावंत, LOP आलेमाव यांनी केली जखमींची विचारपूस

म्हणूनच आज देशभरातून भारतीय सैन्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच दहशतवाद विरोधी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी तिरंगा यात्रा काढून हात बळकट करण्यात येत आहेत. दरम्यान, भारत माता की जय, वंदे मातरम असे जोरदार नारे लावत देशप्रेमी नागरिकांनी साखळी शहर दणाणून सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com