Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: फातोर्ड्यात विरोधकांचा 'एकवट'! विरोधकांचे संघटितपणाचे प्रदर्शन; कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपीचे नेते एकत्र

Goa Politics News: दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकारसुर वधाचे औचित्य साधून कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोवन्स या तीनही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत ‘एकवटा’चे प्रदर्शन केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकारसुर वधाचे औचित्य साधून कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोवन्स या तीनही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत ‘एकवटा’चे प्रदर्शन केले.

फातोर्डा युवा शक्तीने फातोर्डा येथील एसजीपीडीए मैदानावर रविवारी रात्री आयोजित नरकासूर व श्रीकृष्ण विजयोत्सव स्पर्धेच्या निमित्ताने वरील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले व आपल्या संघटितपणाचे प्रदर्शन घडविले. हे तिन्ही पक्षा जिल्हा पंचायत निवडणुकी बरोबरच मार्च-एप्रिल २०२६ मधील नगरपालिका व नंतर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकत्रित काम करण्याची शक्यता सर्व पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली.

भाजपचा पराभव करण्याचा असेल तर विरोधी पक्ष एकत्र आले पाहिजे. राज्यात जो भ्रष्टाचार व अन्यायाचा नरकासूर अवतरला आहे, त्यावर आळा घालण्यासाठी विरोधकांचा एकवट अत्यंत महत्त्वाचा आहे, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी याप्रसंगी सांगितले.

गोव्याच्या रक्षणासाठी आपला पक्ष कुठलाही त्याग करायला तयार आहे, असे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. गोमंतकीय केवळ "सुशेगाद" नसून गरज पडली तर राजकीय समीकरणे सुद्धा बदलायला ते मागे पुढे पहात नाहीत. यापूर्वी असा अनुभव गोव्याने अनुभवला आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले. भाजपच्या राज्यात गोवा नवी वसाहत अनुभवत आहे. भाजपच्या आशीर्वादाने परप्रांतियांनी उत्तर गोवा काबीज करण्यास सुरवात केली आहे. मागे पुढे ही परिस्थिती दक्षिण गोव्यावर सुद्धा येऊ शकते. त्यासाठी राजकीय क्रांतीची गरज असल्याचेही सरदेसाई यांनी याप्रसंगी सांगितले.

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब यांनीही याच भावना व्यक्त केल्या. भारतीय जनता पक्ष सर्वच क्षेत्रात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. आपचे माजी कार्यकारी अध्यक्ष राजेश कळंगुटकर यांनी विरोधी पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

विरोधी पक्ष एकत्र येणे हे चांगले : पालेकर

विरोधी पक्ष एकत्र येऊ नये असे आम आदमी पक्षाने कधीच म्हटलेले नाही. उलट विरोधी पक्षांनी एकत्र यावे ही आमची सुद्धा भावना व भूमिका आहे. आम आदमी पक्ष विरोधी आघाडीच्या विरोधात मुळीच नाही. पण आघाडीचा हेतू स्पष्ट असावा, असे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वकील अमित पालेकर यांनी सांगितले आहे.

आम्हाला आमंत्रण नसल्याने फातोर्डातील श्रीकृष्ण उत्सव व नरकासूर स्पर्धेला आम्ही उपस्थिती लावली नाही. आम्ही सुद्धा विरोधी पक्षाची आघाडी करण्यासाठी आवाहन केले होते. पण आमच्या आवाहनाला इतरांचा प्रतिसाद मिळाला नाही, असेही पालेकर यांनी सांगितले.

भाजपला पराभूत करणे हे आमचे सुद्धा लक्ष्य आहे. आगामी काळात आमच्याकडून सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT