Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्यात काँग्रेसचा युतीसाठी वेग वाढला; फॉरवर्ड आणि 'आरजी'शी चर्चा करून प्रचार सुरू करण्याचे निर्देश

Goa Assembly Election 2027: २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या राजकीय व संघटनात्मक तयारीचा आढावा वेणुगोपाल यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा फॉरवर्ड आणि आरजी (बोरकर गट) या पक्षांशी आघाडी त्वरित जाहीर करावी आणि संयुक्तपणे प्रचारासही सुरुवात करावी, तसेच जागावाटपाचाही निर्णय त्वरित तिन्ही पक्षांनी चर्चेने सोडवावा, अशा स्पष्ट सूचना आज कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीतील बैठकीत गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या नेत्यांना केल्या.

२०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या राजकीय व संघटनात्मक तयारीचा आढावा वेणुगोपाल यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला. नवी दिल्ली येथे इंदिरा भवनात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार ॲड. कार्लुस आल्वारिस फेरेरा, एम. के. शेख आणि सुनील कवठणकर उपस्थित होते.

या बैठकीविषयी ‘गोमन्तक’ला माहिती देताना गिरीश चोडणकर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बळकटीकरण, भविष्यातील राजकीय रणनीती आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आखायच्या व्यापक कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘गोंय राखण यात्रे’च्या समारोपावरही यावेळी चर्चा झाली. तसेच या जनआंदोलनाचा पुढील टप्पा असलेल्या आगामी ‘गोंय राखण अभियाना’च्या नियोजनावर स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतल्यानंतर वेणुगोपाल यांनी काही सूचना केल्या आहेत.

या बैठकीत गोव्याची जमीन, अस्मिता, पर्यावरण आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत राज्याच्या कानाकोपऱ्यांत जाऊन जनतेशी संवाद साधण्यात येईल. त्याचबरोबर ‘गोवा संरक्षण अभियाना’च्या माध्यमातून जनजागृती आणि जनसमर्थनावर भर देण्यात येणार आहे. जनतेशी काँग्रेस कार्यकर्त्यांचा थेट संवाद अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही शिष्टमंडळाने बैठकीत सांगितले.

जाहीरनामा तयार करणार विरियातो

राज्यातील महिला, युवा वर्ग, बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी तसेच विविध घटकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करावा. या जाहीरनाम्याची जबाबदारी खासदार कॅप्टन फर्नांडिस यांच्यावर सोपविली आहे. प्रत्येक घटकापर्यंत आपला जाहीरनामा पोचला पाहिजे, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले.

फॉरवर्ड, ‘आरजी’शी युती करा!

गोवा फॉरवर्ड, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष (आमदार वीरेश बोरकर गट) यांच्याशी लवकरात लवकर बोलणी करून आघाडी जाहीर करावी. तिन्ही पक्षांनी संयुक्तरित्या प्रचार करावा. सत्ताधारी पक्षाविरोधात आक्रमकरित्या भूमिका मांडावी. त्याचबरोबर शक्य तितक्या लवकर स्थानिक पातळीवर जागावाटप ठरवून प्रचारासही सुरवात करावी, असे वेणुगोपाल यांनी सूचविल्याचेही चोडणकर यांनी सांगितले.

महिलांसाठी कृती दल

राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना भ्रष्टाचार, कथित जमीन बळकावण्याचे प्रकार, पर्यावरणाचा ऱ्हास आणि गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण अस्मिता नष्ट होण्याच्या वाढत्या धोक्याबाबत काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेल्या चिंतांवरही चर्चा झाली. महिलांवर होणारे अत्याचार आणि गुन्ह्यांची वाढलेली व्याप्ती पाहता महिलांसाठी पक्षाकडून कृती दल तयार करावे आणि त्या दलातर्फे आक्रमकरित्या आवाज उठवावा, असेही वेणुगोपाल यांनी सूचित केल्याचे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Issue: कोमुनिदाद जमिनीवर दोड्डामणींचे नाव; सांत आंद्रेत संताप, वीरेश बोरकर लक्ष्यावर!

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

SCROLL FOR NEXT