काणकोण: काँग्रेसच्या काळात राज्यभरात फक्त विकासकामांच्या पायाभरणीचे दगड बसविण्यात आले. मात्र प्रकल्प कधीच पूर्ण झाले नाहीत. हे सर्व दगड एकत्र केल्यास काही प्रकल्प पूर्ण झाले असते, असा टोला पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी विरोधकांना लगावला.
पैंगीण ग्रामपंचायतीची नूतनीकरण केलेली वास्तू आणि सभागृहाचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर गुदिन्हो बोलत होते. यावेळी सभापती डॉ. रमेश तवडकर, सरपंच सविता तवडकर, उपसरपंच सुनील पैंगीणकर, गटविकास अधिकारी प्रणित नाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी शाश्वत क्लबच्या महिलांनी स्वागतगीत सादर केले. पंच शिल्पा प्रभू गावकर, अस्मिता जोशी, रसिका वेळीप, जॉन बार्रेटो, प्रविर भंडारी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सूत्रसंचालन संजय गावकर व व्यंकटराव नाईक यांनी केले. उपसरपंच सुनील पैंगीणकर यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. यजमानपद पंच सतीश पैंगीणकर यांनी भूषविले.
शांताराम भट, काशीबाई पैंगीणकर, प्रभाकर पैंगीणकर, कुष्ठा तळपणकर, गोविंद आचार्य, लियांव व्हिएगस, दित्रोज बार्रेटो, पीटर गुदिन्हो, जनार्दन भंडारी, मृणाल नमशीकर, तेजस्विनी देयकर, महेश नाईक, रामदास पुजारी, तुळशीदास नाईक व जगदीश गावकर या माजी सरपंचांचा गौरव करण्यात आला. यापैकी काहींचा मरणोत्तर सन्मान केला गेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.