Goa Bad Roads Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: निष्काळजी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका! खराब रस्त्यांवरून काँग्रेस आक्रमक

Bad Roads Goa: कळंगुट, शिवोली व साळगाव मतदारसंघातील चाळण झालेल्या रस्त्यांबाबत चिंता व्यक्त करीत हे रस्ते त्वरीत दुरूस्त करावे. तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या गट समितींनी साबांखाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Congress Aggressive Against Bad Road Condition At Siolim, Calangute, Siolim

म्हापसा: कळंगुट, शिवोली व साळगाव मतदारसंघातील चाळण झालेल्या रस्त्यांबाबत चिंता व्यक्त करीत हे रस्ते त्वरीत दुरूस्त करावे. तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या गट समितींनी साबांखाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. तसे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.

यावेळी काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, युवा समितीचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा, कळंगुट गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा, चंदन मांद्रेकर, राजेंद्र कोरगावकर तसेच कळंगुट, साळगाव व शिवोली गट समितीच्या पदाधिकारी उपस्थित होते. कळंगुट मधील एकाही रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत, असा दावा कार्यकारी अभियंता भेबे यांनी केला असता काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

त्यानंतर त्यांनी कळंगुटमधील रस्त्यांची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. नंतर दुपारी कार्यकारी अभियंता भोबे यांनी कळंगुट मध्ये भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली. कळंगुटमध्ये रस्त्याचे काम केलेल्या अद्याप एकाही कंत्राटदारावर सरकारने कारवाई केलेली नाही. त्यामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणात निष्काळजीपणा केलेल्या या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

SCROLL FOR NEXT